Breaking News

जनगणना २०२७ तयारीला वेग; सांगोला तालुक्यात ४४५ प्रगणक व ७५ पर्यवेक्षक नियुक्त, प्रशिक्षणाला सुरुवात

जनगणना २०२७ तयारीला वेग; सांगोला तालुक्यात ४४५ प्रगणक


व ७५ पर्यवेक्षक नियुक्त, प्रशिक्षणाला सुरुवात

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुक्यात जनगणना २०२७ कार्यक्रमाची तयारी वेगाने सुरू झाली असून ग्रामीण भागासाठी एकूण ४०३ प्रगणक गट निश्चित करण्यात आले आहेत.

 या गटांसाठी ४०३ प्रगणक व ४२ राखीव मिळून एकूण ४४५ प्रगणक, तसेच ६८ पर्यवेक्षक व ७ राखीव मिळून ७५ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण Sinhgad College Kamalapur येथे सुरू असून, एकूण २०० जणांचे तीन दिवसीय सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. 

हे प्रशिक्षण ४ डिजिटल क्लासरूममध्ये २४ एप्रिल २०२६ ते ६ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. प्रशिक्षणासाठी एकूण ८ मास्टर ट्रेनर कार्यरत आहेत.

प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी सुशांत बनसोडे (उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन, सोलापूर) यांनी प्रशिक्षणस्थळी भेट देत प्रगणक व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन केले.

दरम्यान, प्रत्यक्ष जनगणना कार्यक्रमाची पहिली फेरी १६ मे २०२८ पासून सुरू होणार आहे.

 नवीन तरतुदीनुसार नागरिकांना १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेत स्वगणना पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments