आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश;
सांगोल्यात 5 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 25 लाखांचा इमारत निधी मंजूर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजाला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वतंत्र व सुसज्ज इमारतींचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून गौडवाडी, बुद्धेहाळ, राजुरी,
नाझरे आणि नराळे या पाच ग्रामपंचायतींना नवीन इमारतीसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हा निधी ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना’ अंतर्गत देण्यात आला असून, यामुळे ग्रामपंचायत प्रशासन अधिक सक्षम होणार आहे.
ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व अधिकारी यांना सध्या भेडसावणाऱ्या जागेअभावी अडचणी दूर करण्यासाठी आमदार देशमुख यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता.
गावपातळीवरील प्रशासन अधिक प्रभावी व्हावे आणि नागरिकांना सेवा सुलभतेने मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
दरम्यान, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे अधिवेशनापूर्वीच निधीची
मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत त्यांनी तात्काळ निधी मंजूर केला.
निधी मंजुरीनंतर ग्रामपंचायतींच्या नव्या इमारतींना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने संबंधित गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री जयकुमार गोरे यांचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.
चौकट:
ग्रामपंचायतींना स्वतंत्र व सुसज्ज कार्यालयीन इमारत मिळाल्यास शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होते.
नागरिकांना दर्जेदार सेवा मिळावी, यासाठीच आमदार देशमुख यांनी या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.


0 Comments