google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “कोठडी की कत्तलखाना?” अकोल्यात पोलीस ठाण्यातच महिलांची अब्रू धोक्यात — ‘मुलगी पाठव’ म्हणणारा एएसआय फरार!

Breaking News

“कोठडी की कत्तलखाना?” अकोल्यात पोलीस ठाण्यातच महिलांची अब्रू धोक्यात — ‘मुलगी पाठव’ म्हणणारा एएसआय फरार!

“कोठडी की कत्तलखाना?” अकोल्यात पोलीस ठाण्यातच महिलांची अब्रू धोक्यात — ‘मुलगी पाठव’ म्हणणारा एएसआय फरार! 


अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेली संतापजनक घटना राज्यभरात खळबळ उडवणारी ठरली आहे. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या 

पोलीस दलातील अधिकाऱ्यानेच कोठडीत असलेल्या महिलेकडे तिच्या मुलीला शरीरसुखासाठी पाठवण्याची घृणास्पद मागणी केल्याचा आरोप समोर आला आहे.

सायबर फसवणुकीच्या सुमारे ८० लाख रुपयांच्या प्रकरणात संबंधित महिला पोलीस कोठडीत होती. याच काळात ड्युटीवर असलेल्या एएसआय राजेश जाधव याने पैशांचे आमिष दाखवत, “१० हजार देतो, मुलगी पाठव,” अशी लाजीरवाणी मागणी केल्याचे पीडितेने सांगितले आहे.

घटना उघड होताच अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तत्काळ कारवाई करत आरोपी जाधव यांना निलंबित केले.

 त्यांच्या विरोधात विनयभंगासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कारवाईनंतर जाधव फरार झाल्याने पोलीस प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकारामुळे “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या पोलीस ब्रीदवाक्यालाच तडा गेला आहे. पोलीस कोठडीत महिलांची सुरक्षितता कितपत आहे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जनतेत प्रचंड रोष पसरला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे आरोप झाल्याची चर्चा असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

या धक्कादायक घटनेमुळे अकोल्यातील पोलीस यंत्रणा हादरली असून, दोषींवर कठोर कारवाई करून महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Post a Comment

0 Comments