मेथवडे गावचा अभिमान! दिलवर वाघमारे यांची पदोन्नती सांगोला तहसील कार्यालयात शिपाई पदावर नियुक्ती
सांगोला | प्रतिनिधी मेथवडे गावचे कोतवाल दिलवर निर्मळ वाघमारे यांची पदोन्नती होऊन त्यांची सांगोला तहसील कार्यालयात शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या यशामुळे मेथवडे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिलवर वाघमारे यांनी कोतवाल म्हणून काम करताना प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध जपत
उत्तम सेवा बजावली. त्यांच्या कामाची दखल घेत प्रशासनाने त्यांना पदोन्नती देत शिपाई पदावर नियुक्ती केली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच सहकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत असून,
“आमचे सहकारी मित्र दिलवर वाघमारे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
त्यांच्या पुढील कारकिर्दीतही ते अशाच प्रामाणिकपणे काम करून प्रशासनात नावलौकिक मिळवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 💐


0 Comments