google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात संतापाची लाट लाजिरवाणी घटना! मतीमंद महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी जेरबंद

Breaking News

सांगोल्यात संतापाची लाट लाजिरवाणी घटना! मतीमंद महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी जेरबंद

सांगोल्यात संतापाची लाट लाजिरवाणी घटना! मतीमंद महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी जेरबंद


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील अजनाळे गावात मतीमंद महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली

 असून, या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही जन्मतः मतीमंद असून ती अजनाळे येथे एकटी राहत होती.

 तिची देखभाल शेजारी राहणारी एक महिला गेल्या काही वर्षांपासून करत होती.

दि. ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारच्या सुमारास गावातील विजय विठ्ठल कोळवले (रा. अजनाळे) याने संबंधित महिलेच्या घरात 

प्रवेश करून स्वतःचे तसेच पीडितेचे कपडे काढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

घटना लक्षात येताच फिर्यादी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चौकशीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. 

विशेष म्हणजे, पीडित महिला मतीमंद असल्याचे माहित असतानाही आरोपीने असे कृत्य केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, अशा अमानुष प्रकारांना आळा बसावा यासाठी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments