google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “सांगोल्यात गुटखा माफियांचा हैदोस! कारवाई न झाल्यास १ मे पासून उपोषणाचा इशारा..“प्रशांत बबन धनवजीर (नगरसेवक, सांगोला) – गुटखा माफियांविरोधात आक्रमक भूमिका”

Breaking News

“सांगोल्यात गुटखा माफियांचा हैदोस! कारवाई न झाल्यास १ मे पासून उपोषणाचा इशारा..“प्रशांत बबन धनवजीर (नगरसेवक, सांगोला) – गुटखा माफियांविरोधात आक्रमक भूमिका”

“सांगोल्यात गुटखा माफियांचा हैदोस! कारवाई न झाल्यास १ मे पासून उपोषणाचा इशारा..


“प्रशांत बबन धनवजीर (नगरसेवक, सांगोला) – गुटखा माफियांविरोधात आक्रमक भूमिका”

सांगोला | प्रतिनिधी सांगोला शहर व ग्रामीण भागामध्ये गुटखा माफियांचा बेकायदेशीर व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचा गंभीर आरोप

 नगरसेवक प्रशांत बबन धनवजीर यांनी केला आहे. या प्रकरणात त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा १ मे (कामगार दिन) पासून उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही सराईत गुन्हेगारांकडून बाहेरून मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी करून सांगोला शहर व ग्रामीण भागात विक्री केली जात आहे.

 या अवैध व्यवसायामुळे विशेषतः तरुण पिढी व्यसनाधीन होत असून कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणातील काही आरोपींवर यापूर्वी गुन्हे दाखल असूनही ते जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच व्यवसायात सक्रिय झाल्याचा आरोप आहे. काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे हे रॅकेट पुन्हा सुरू असल्याचीही चर्चा रंगत आहे.

नगरसेवक धनवजीर यांनी यापूर्वीही प्रशासनाला पत्राद्वारे याबाबत कळविले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे संतप्त होत

 त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तात्काळ कारवाई झाली नाही तर ते आपल्या कार्यकर्त्यांसह पुणे येथे संबंधित अधिकाऱ्यांसमोर १ मे पासून उपोषणास बसतील.

👉 “गुटखा माफियांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन उग्र होईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments