“वाढदिवसानिमित्त अनोखा सन्मान!”शिवनेत बाळकृष्ण भगत साहेबांचा दिमाखदार सत्कार;
सामाजिक एकतेचा संदेश भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय बापू बनसोडे व सरपंच दादासाहेब घाडगे
शिवने | प्रतिनिधी शिवने गावात वाढदिवसाच्या निमित्ताने एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी प्रसंग अनुभवायला मिळाला. मा. प्रताप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेले सन्माननीय श्री बाळकृष्ण भगत साहेब यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करून सन्मान करण्यात आला.
गावाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विद्यमान सरपंच मा. दादासाहेब घाडगे यांच्या हस्ते भगत साहेबांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या टाळ्यांच्या गजरात वातावरण उत्साहपूर्ण आणि आनंदमय झाले.
या सोहळ्यास भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय बापू बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य मेजर श्री संभाजी घाडगे, नानासाहेब घाडगे सर, श्री शिवाजी राजे घाडगे, श्री विक्रम घाडगे तसेच उपसरपंच उदय घाडगे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून सामाजिक एकोपा, मैत्री आणि परस्पर सन्मान यांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे गावात एकतेची भावना अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिवने गावाने केलेल्या या अनोख्या सन्मानामुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली असून, हा सोहळा गावकऱ्यांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


0 Comments