google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “१५ एप्रिलपर्यंत मोठी संधी! जयहिंद पतसंस्थेचे नवीन सभासदत्व व शेअर्स विक्री सुरू”

Breaking News

“१५ एप्रिलपर्यंत मोठी संधी! जयहिंद पतसंस्थेचे नवीन सभासदत्व व शेअर्स विक्री सुरू”

“१५ एप्रिलपर्यंत मोठी संधी! जयहिंद पतसंस्थेचे नवीन सभासदत्व व शेअर्स विक्री सुरू”


सांगोला (प्रतिनिधी): सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या जयहिंद (मा. सै.) नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगोला येथे नवीन सभासद नोंदणी व शेअर्स विक्रीस सुरुवात झाली

 असून ही प्रक्रिया १५ एप्रिल २०२६ अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन सोमेश यावलकर यांनी दिली.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील नियमांनुसार शेअर्स धारण करण्यासाठी आवश्यक अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार इच्छुक नागरिकांनी या संधीचा लाभ घेत संस्थेचे सभासद व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन सभासदत्वासाठी इच्छुकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, रेशन कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.

सभासद होण्यासाठी खालील शुल्क लागू राहील:

शेअर्स रक्कम: ₹३०००

प्रवेश फी: ₹१००

फॉर्म फी: ₹६०

सेव्हिंग खाते: ₹१००

तसेच ज्या विद्यमान सभासदांची शेअर्स रक्कम ₹११०० आहे, त्यांनी उर्वरित रक्कम भरून ती ₹३००० पर्यंत पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ८४४६९५८००१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे संस्थेकडून कळविण्यात आले आहे.

👉 इच्छुकांनी वेळ न दवडता या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन सोमेश यावलकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments