Breaking News

“निर्घृण! किरकोळ कारणावरून नातीने ८२ वर्षीय आजीची हत्या; करमाळा तालुका हादरला”

“निर्घृण! किरकोळ कारणावरून नातीने ८२ वर्षीय आजीची हत्या; करमाळा तालुका हादरला”


सोलापूर | प्रतिनिधी नातेसंबंधांची माणुसकी हरवून टाकणारी एक धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात उघडकीस आली आहे. 

किरकोळ कारणावरून संतापाच्या भरात नातीनेच आपल्या ८२ वर्षीय अर्धांगवायूग्रस्त 

आजीची दगडावर डोके आपटून निर्घृण हत्या केल्याची घटना विहाळ येथे घडली असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मृत वृद्धेचे नाव जनाबाई भगवान सुरवसे (वय ८२, रा. विहाळ) असे असून त्या काही दिवसांपासून अर्धांगवायूने त्रस्त होत्या.

 ११ एप्रिल रोजी रात्री त्यांच्या नात मनीषा रवींद्र लवंगारे हिच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. 

आजी सतत किरकिर करते, या कारणावरून संतापलेल्या मनीषाने प्रथम आजीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिचे डोके दगडावर आपटून हत्या केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, विहाळ येथे यात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलीस तैनात असताना

 ‘डायल ११२’ वर एका वृद्ध महिलेला मारहाण होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

मात्र, तोपर्यंत जनाबाई यांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी रक्ताचे सडे पडलेले होते व मृतदेहाच्या डोक्याला गंभीर जखमा आढळून आल्या.

या प्रकरणी पोलीस हवालदार दीपक घोरपडे यांनी फिर्याद दिली असून, आरोपी मनीषा लवंगारे हिला अटक करण्यात आली आहे. 

शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करत आहेत. 

या अमानुष घटनेमुळे विहाळ परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments