Breaking News

धक्कादायक! पंढरपुरात नगरसेवकाचा कोयत्याने जीवघेणा हल्ला; ३ तरुण गंभीर जखमी, २० जणांवर गुन्हा “नगरसेवकच झाला हल्लेखोर! पंढरपूरात खळबळ”

धक्कादायक! पंढरपुरात नगरसेवकाचा कोयत्याने जीवघेणा हल्ला;


३ तरुण गंभीर जखमी, २० जणांवर गुन्हा “नगरसेवकच झाला हल्लेखोर! पंढरपूरात खळबळ” 

पंढरपूर | प्रतिनिधी पंढरपूर शहरात एका विद्यमान नगरसेवकाने साथीदारांसह तिघांवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली

 असून या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 

या हल्ल्यात तीन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश यादव असे या नगरसेवकाचे नाव असून तो भालके गटाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा विद्यमान नगरसेवक आहे. 

त्याच्यासह माजी नगरसेवक नागेश यादव आणि इतर साथीदारांसह एकूण २० जणांवर पंढरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तिघांकडे आरोपींकडून काही दिवसांपासून ‘भिशी’ लावण्याचा तगादा लावला जात होता. 

मात्र संबंधित तरुणांनी भिशी लावण्यास नकार दिल्याने आरोपींच्या मनात राग निर्माण झाला होता.

याच कारणातून लोकेश यादव आणि नागेश यादव यांनी आपल्या काही साथीदारांसह मिळून कोयत्याने तिघांवर जीवघेणा हल्ला केला.

 या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पंढरपूर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पंढरपूर पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments