Breaking News

सांगोला तालुक्यात ग्रामपंचायत पोट निवडणुकचा बिगुल; ७ ते १३एप्रिल दरम्यान नामनिर्देशन प्रक्रिया तहसिलदार कु.बाळुताई भागवत

       सांगोला तालुक्यात ग्रामपंचायत पोट निवडणुकचा बिगुल; ७ ते १३एप्रिल दरम्यान नामनिर्देशन प्रक्रिया तहसिलदार      कु.बाळुताई भागवत


सांगोला : ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना पंचायत समिती कार्यालय, 

तलाठी कार्यालय व संबंधित ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

        या अनुषंगाने नामनिर्देशन पत्रे तहसिल कार्यालय, सांगोला येथे स्वीकारली जाणार आहेत.

📅 निवडणूक वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी :

दिनांक ०७/०४/२०२६ (मंगळवार) ते १३/०४/२०२६ (सोमवार)

वेळ : सकाळी ११.०० ते दुपारी ३.००

(१२/०४/२०२६ रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)

नामनिर्देशन पत्रांचे नमुने :

वरील ठिकाणी व वेळेत उपलब्ध

नामनिर्देशन पत्रांची छाननी :

दिनांक १५/०४/२०२६ (बुधवार) रोजी सकाळी ११.०० वा.

उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत :

दिनांक १७/०४/२०२६ (शुक्रवार) दुपारी ३.०० वाजेपर्यंत

मतदान दिनांक :

२८/०४/२०२६ (मंगळवार)

वेळ : सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०

🧾 निवडणुकीची माहिती :

या प्रक्रियेसाठी २ निवडणूक निर्णय अधिकारी व ४ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

         एकूण ४ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक होत असून ६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

अनकदाळ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाची थेट जनतेतून निवड होणार असून ३ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

 तसेच खवासपूर, चिनके व चिकमहूद या ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी १ सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे.

👉 प्रशासनाने संबंधित मतदारांनी व उमेदवारांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे, तहसिलदार कु.बाळुताई भागवत असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments