Breaking News

जाचाचा शेवट मृत्यूत! माय-लेकरांनी घेतला टोकाचा निर्णय; पती अटकेत, सासूवर गुन्हा सोलापूर जिल्ह्यातील घटना..

जाचाचा शेवट मृत्यूत! माय-लेकरांनी घेतला टोकाचा निर्णय; पती अटकेत, सासूवर गुन्हा सोलापूर जिल्ह्यातील घटना..


मंगळवेढा (सोलापूर): घरगुती छळ, संशय आणि पैशांच्या मागणीने त्रस्त झालेल्या विवाहितेने आपल्या लेकरासह 

जीवन संपवल्याची संतापजनक घटना मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथे उघडकीस आली आहे.

 या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी पतीला अटक केली असून सासूवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

वैशाली अनिल घोडके (वय 36) यांना गेल्या अनेक वर्षांपासून सासरकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता. नवीन दुचाकी घेण्यासाठी ५० हजार रुपये माहेरून

 आणण्याचा तगादा, सततची मारहाण आणि अपमानास्पद वागणूक यामुळे त्यांचे आयुष्य असह्य झाले होते.

यातच, पती अनिल घोडके याने आपल्या मुलांवरच संशय घेत, “ही माझी मुले नाहीत” असा आरोप करत त्यांना घराबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

अत्याचारांचा कळस गाठला...

पीडितेची आई रुक्मिणी मागाडे (रा. पंढरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, “कुठेतरी जाऊन मरा” असे टोमणे देत वैशाली व तिच्या मुलांना सतत त्रास दिला जात होता. 

उपासमार, अपमान आणि असह्य मानसिक ताण यामुळे अखेर वैशाली यांनी आपल्या मुलासह टोकाचा निर्णय घेतला.

पोलीस कारवाई

घटनेची गंभीर दखल घेत मंगळवेढा पोलिसांनी पती अनिल ज्ञानेश्वर घोडके याला अटक केली

 असून सासू शिवबाई घोडके यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

समाजात संतापाची लाट

या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत असून, महिलांवरील अत्याचार आणि कौटुंबिक छळाच्या घटनांबाबत

 पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. माय-लेकरांच्या या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळला आहे.

Post a Comment

0 Comments