Breaking News

सांगोला नगरपरिषदेचा महिलांसाठी सुवर्णसंधी! ५० जणींना MS-CIT प्रशिक्षण; अर्ज प्रक्रिया सुरू

सांगोला नगरपरिषदेचा महिलांसाठी सुवर्णसंधी! ५० जणींना MS-CIT प्रशिक्षण; अर्ज प्रक्रिया सुरू


सांगोला : सांगोला नगरपरिषदेमार्फत महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत शहरातील महिला व मुलींसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता 

MS-CIT प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे महिलांना संगणक ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा उद्देश आहे.

या प्रशिक्षणासाठी इच्छुक लाभार्थींनी नगरपरिषदेकडील विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

 अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार असून निवड झालेल्या लाभार्थींना रुपये ८००/- इतके प्रशिक्षण शुल्क भरावे लागणार आहे.

प्रवेश अर्ज वितरणाची प्रक्रिया दि. ०१ मे २०२६ पासून सुरू होऊन दि. १५ मे २०२६ पर्यंत चालणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 

दि. १५ मे २०२६ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या MS-CIT कोर्समध्ये MS-Office (Word, Excel, PowerPoint), Outlook, Web Designing तसेच AI तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

एकूण ५० प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जाणार असून प्रशिक्षण कालावधी ३ महिन्यांचा असेल. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता ९ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्जासोबत शैक्षणिक गुणपत्रक, रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखला तसेच ओळखपत्र (आधार कार्ड/मतदान ओळखपत्र/परवाना) जोडणे बंधनकारक आहे.

दरम्यान, प्रशिक्षणासाठी ये-जा खर्च संबंधित लाभार्थींनाच करावा लागणार असून एकदा निश्चित झालेली

 संस्था, बॅच किंवा प्रवेश बदलता येणार नाही. तसेच एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अधिक माहितीसाठी महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (संपर्क: ७९७२१००३६५, ७७०९०९२२४१)

Post a Comment

0 Comments