Breaking News

सांगोल्यात राजकीय रंगत! तीन ग्रामपंचायती बिनविरोध, अनकढाळ सरपंचपदासाठी ७ उमेदवारांमध्ये थेट लढत

सांगोल्यात राजकीय रंगत! तीन ग्रामपंचायती बिनविरोध,


अनकढाळ सरपंचपदासाठी ७ उमेदवारांमध्ये थेट लढत 

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकांनी सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाली असली 

तरी अनकढाळ येथे सरपंच पदासाठी रंगतदार लढत होणार असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

३० मार्च २०२६ रोजी जाहीर अधिसूचनेनुसार ७ ते १३ एप्रिल दरम्यान तहसील कार्यालय, सांगोला येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. 

१५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी करण्यात आली असून सर्व अर्ज वैध ठरले आहेत.

दरम्यान, तालुक्यातील खवासपूर, चिकमहुद आणि चिनके या तीन ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. 

खवासपूर येथे एकच अर्ज आल्याने निवडणूक थेट बिनविरोध झाली,

 तर चिकमहुद आणि चिनके येथे प्रत्येकी दोन अर्ज आले होते. मात्र, एका उमेदवाराने अर्ज मागे

 घेतल्याने दोन्ही ठिकाणी एकच उमेदवार शिल्लक राहून बिनविरोध निवड निश्चित झाली.

मात्र, अनकढाळ ग्रामपंचायत सरपंच पदासाठी चित्र वेगळेच आहे. येथे तब्बल ७ उमेदवार रिंगणात उतरले असून, 

एकाही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. त्यामुळे येथे थेट जनतेतून सरपंच निवड होत असल्याने ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

या पोटनिवडणुकांमुळे सांगोल्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, आता अनकढाळच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments