“सांगोल्यात क्रीडाक्षेत्राला नवे बळ! ‘ऑलिम्पिक स्पोर्ट्स गुड्स’चे भव्य उद्घाटन”पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते
सांगोला | प्रतिनिधी ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने सांगोला शहरात ‘ऑलिम्पिक स्पोर्ट्स गुड्स’ या आधुनिक स्पोर्ट्स युटिलिटी शॉपचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले.
कडलास रोडवरील या दालनाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यास सुहास बाबर, शहाजीबापू पाटील, दीपकआबा साळुंखे पाटील तसेच ऑलिम्पिक व अर्जुन पुरस्कार विजेत्या ललिता बाबर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, “माण तालुक्याची कन्या ललिताताई बाबर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जागतिक स्तरावर यश संपादन करत
संपूर्ण देशाचा गौरव वाढवला. त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन उभे राहिलेले हे स्पोर्ट्स दालन ग्रामीण भागातील खेळाडूंना नवी दिशा देईल.”
ते पुढे म्हणाले की, ललिताताईंच्या मार्गदर्शनाखाली चेतन भोसले हे या उपक्रमाला नक्कीच मोठ्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ललिता बाबर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ग्रामीण भागात प्रचंड क्षमता असलेले अनेक खेळाडू आहेत;
मात्र योग्य साधनसामग्रीच्या अभावामुळे त्यांना संधी मिळत नाही.
‘ऑलिम्पिक स्पोर्ट्स गुड्स’च्या माध्यमातून दर्जेदार व परवडणाऱ्या दरात क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, क्रीडाप्रेमी, युवक-युवती व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या दालनात विविध खेळांसाठी लागणारे आधुनिक साहित्य उपलब्ध होणार असून, परिसरातील खेळाडूंना याचा मोठा लाभ होणार आहे.
कार्यक्रमात तहसीलदार बाळूताई भागवत, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्यासह इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.
समारोप प्रसंगी डॉ. संदीप भोसले (IRS) यांनी आभार मानले.


0 Comments