“वाढेगावात जुगार्यांचा पर्दाफाश! पोलिसांची धाड; पाच जण रंगेहात जाळ्यात”
सांगोला : तालुक्यातील वाढेगाव येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर सांगोला पोलिसांनी धडक कारवाई करत पाच जणांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल वसीम नजीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे,
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आदेशानुसार 28 मार्च रोजी दुपारी सुमारे 3.45 वाजता वाढेगाव ते जुना राजापूर रस्त्यावर धाड टाकण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अजित रोडगे यांच्या घरासमोरील चिलारी झाडाखाली छापा टाकला असता, काही इसम गोलाकार बसून रमी जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी तत्काळ सर्वांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पकडण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत :
सूर्याधन संदीपान सूर्यगंध (55)
ज्ञानेश्वर तुकाराम गस्ते (32)
विकास दामोदर गेजगे (33)
महेश सुमंत फाळके (28)
अमित पोपट सूर्यगंध (30)
(सर्व रा. वाढेगाव, ता. सांगोला)
पोलिसांनी आरोपींकडून 2,160 रुपये रोख रक्कम व बावन्न पत्त्यांचे दोन संच असा मुद्देमाल जप्त केला आहे. पंचासमक्ष जप्तीची कारवाई करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, सांगोला पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा देत नागरिकांना अशा बेकायदेशीर कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.


0 Comments