Breaking News

जवळा येथे शारदादेवी (काकी) साळुंखे-पाटील स्मारकाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट; ग्रामस्थांत समाधान

जवळा येथे शारदादेवी (काकी) साळुंखे-पाटील स्मारकाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट; ग्रामस्थांत समाधान


सांगोला प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी जवळा येथे ह.भ.प. शारदादेवी (काकी) बापूसाहेब साळुंखे-पाटील यांच्या स्मारकास धावती भेट दिली.

 सोलापूर जिल्ह्याचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील यांच्या मातोश्रींच्या स्मारकाला दिलेल्या या भेटीमुळे स्थानिक पातळीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी युवा नेते यशदादा साळुंखे पाटील, सांगोला भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब एरंडे (मालक), उद्योगपती बाळासाहेब काटकर, वाढेगावचे सरपंच नंदकुमार दिघे, 

कोळा जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख, पोपट गडदे, सुनिल आबा साळुंखे, अरुण भाऊ घुले, बाबासाहेब इमडे, विठ्ठल गयाळी, नारायण भाऊ गावडे तसेच जवळा गावचे सरपंच सज्जन मागाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ट्रस्टमार्फत सुरू असलेल्या मोफत अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. गोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची विचारपूस केली व त्यांना प्रोत्साहन दिले.

व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून गावाला भेट दिल्याबद्दल पालकमंत्री गोरे यांचे जवळा गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments