Breaking News

सांगोल्यात मुलांसाठी आलदर हॉस्पिटलचे मोफत आरोग्य शिबिर; तज्ज्ञांकडून तपासणी आणि औषधोपचार

सांगोल्यात मुलांसाठी आलदर हॉस्पिटलचे मोफत आरोग्य शिबिर; तज्ज्ञांकडून तपासणी आणि औषधोपचार


सांगोला (प्रतिनिधी) : सांगोल्यातील सुप्रसिद्ध आलदर हॉस्पिटल (बालरुग्णालय व नवजात शिशु अतिदक्षता विभाग) 

यांच्या वतीने मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

 हे शिबिर सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० लिटील मिलेनियम प्रिस्कूल, चिंचोली रोड, सांगोल्यात होणार आहे.

शिबिरात नुकत्याच जन्माला आलेल्या बाळापासून १८ वर्षांपर्यंतच्या मुलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाईल. 

ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांमध्ये वाढणारे आजार, कुपोषण आणि शारीरिक व्याधींवर वेळेत उपचार मिळावेत, हा शिबिराचा मुख्य उद्देश आहे.

तपासणीनंतर गरज असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलकडून मोफत औषधे पुरवली जातील. 

तसेच, शस्त्रक्रिया किंवा पुढील मोठ्या उपचारांची गरज असलेल्या बालकांना शासकीय योजनेतून मदत मिळवून दिली जाईल.

 हे शिबिर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना अंतर्गत राबवले जात आहे.

पालकांनी शिबिरात येताना आयुष्मान भारत कार्ड किंवा गोल्डन कार्ड (उपलब्ध असल्यास) सोबत आणणे आवश्यक आहे.

आलदर हॉस्पिटल प्रशासनने पालकांना आवाहन केले आहे की, “मुलांचे आरोग्य हीच राष्ट्राची संपत्ती आहे. किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष न करता या मोफत शिबिराचा लाभ घ्या.”

अधिक माहितीसाठी संपर्क साधा: ९०२९० ४४००९.

Post a Comment

0 Comments