google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुंबईत सांगोल्याच्या नूतन सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून सत्कार; विकासासाठी राज्याकडून मदतीची ग्वाही माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांची उपस्थिती

Breaking News

मुंबईत सांगोल्याच्या नूतन सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून सत्कार; विकासासाठी राज्याकडून मदतीची ग्वाही माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांची उपस्थिती

मुंबईत सांगोल्याच्या नूतन सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून सत्कार;


विकासासाठी राज्याकडून मदतीची ग्वाही माजी






आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांची उपस्थिती 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोला पंचायत समितीच्या नूतन सभापती पूनम इंगवले यांचा मंगळवार

 (दि. १७ मार्च) रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

 यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री 

व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री Jaykumar Gore यांनीही इंगवले यांचा गौरव करून शुभेच्छा दिल्या.

सांगोला पंचायत समितीवर तब्बल ५५ वर्षे असलेली (शेकाप)ची सत्ता यंदा उलथून टाकत भारतीय जनता पक्षाने प्रथमच सभापती पदावर आपला झेंडा फडकवला. 

या ऐतिहासिक बदलानंतर पूनम इंगवले यांना सभापतीपदाची संधी मिळाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंचायत समिती ही ग्रामीण विकासासाठी महत्त्वाची संस्था असल्याचे सांगत, या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब,

 गरजू आणि उपेक्षित घटकांना न्याय देण्याचे काम करावे, असे मार्गदर्शन केले. 

सांगोला तालुक्याच्या विकासासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील,

 भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजप नेते बाळासाहेब एरंडे, प्रशांत वलेकर, सुदर्शन इंगवले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की,

 सांगोला पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकविण्यात सर्व सदस्य आणि कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे.

 आगामी काळात पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना गती दिली जाईल. 

“सांगोल्याच्या मिनी मंत्रालयाला राज्याच्या मंत्रालयातून निधीची कमतरता भासू देणार नाही,” अशी स्पष्ट ग्वाहीही त्यांनी दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही पूनम इंगवले यांचा सत्कार करून 

सांगोला तालुक्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाकडून आवश्यक निधी आणि सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, सांगोला पंचायत समितीच्या राजकीय इतिहासात स्थापनेपासून बहुतांश काळ शेकापची एकहाती सत्ता होती. मात्र यंदा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली

 ‘ऑपरेशन लोटस’ राबवून राजकीय समीकरणे बदलली. माजी आमदार शहाजीबापू पाटील 

आणि दिपकआबा साळुंखे-पाटील यांना एकत्र आणत पंचायत समितीवर भाजप-महायुतीची सत्ता प्रस्थापित करण्यात यश आले.

चौकट : सांगोल्याला ‘रिटर्न गिफ्ट’ची घोषणा

सांगोला पंचायत समितीवर प्रथमच भाजपचा सभापती झाल्याने सांगोलकरांना मोठे ‘रिटर्न गिफ्ट’ देण्याची घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. 

पंचायत समितीसाठी लवकरच भव्य, आधुनिक आणि सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन लवकरच सांगोल्यात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments