google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेततळी बनली मृत्यूचे सापळे! मुलांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी; पालकांनी घ्यावी मुलांची काळजी, शेतकऱ्यांना आता शेततळ्याला कुंपण करण्याचे बंधन

Breaking News

शेततळी बनली मृत्यूचे सापळे! मुलांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी; पालकांनी घ्यावी मुलांची काळजी, शेतकऱ्यांना आता शेततळ्याला कुंपण करण्याचे बंधन

शेततळी बनली मृत्यूचे सापळे! मुलांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी; पालकांनी घ्यावी


मुलांची काळजी, शेतकऱ्यांना आता शेततळ्याला कुंपण करण्याचे बंधन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शेततळ्यांची संख्या १६ हजारांवर असली, तरी योग्य सुरक्षिततेच्या अभावामुळे ती जीवघेणी ठरत आहेत. 

उन्हाळ्यात पोहण्यासाठी गेलेली मुले किंवा पाणी प्यायला गेल्यावर चुकून पडलेल्या अनेक बालके व शेतकऱ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे.बहुतेक शेततळ्यांना तारेचे कुंपण नसल्याने शेततळी 'मृत्यूचे सापळे' बनत आहेत.

तीव्र उन्हाळ्यात शेतीपिकांना पाण्याची आवश्यकता खूप असते. विहिरीतील पाण्याची पातळी खोलवर जाते, दूर अंतरावरून केलेल्या पाइपलाइनमध्ये पुरेशा दाबाने पाणी येत नाही. काही शेतकऱ्यांच्या विहिरी दूर असतात आणि शेती दुसरीकडे असते. 

अशावेळी पाण्याच्या सोयीसाठी शेतकरी शेततळी खोदतात. त्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते. शेततळे खोदल्यावर अस्तरीकरण (कागद तथा ताडपत्री) केले जाते. त्यामुळे शेततळ्याला पायऱ्या नसतात. 

शेततळ्याची लांबी-रुंदी ४५ ते ६५ फूट लांब असते. बहुतेक शेततळी शेतकऱ्यांच्या घरापासून दूर असतात. त्यामुळे पोहायला किंवा पाणी प्यायला गेलेल्यावर पोहायला न येणारा तळ्यात पडला की त्याचा जातोय अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

प्रमुख गंभीर घटना....

(१) शेटफळजवळील (ता. मोहोळ) देवीचा माळ परिसरातील शेततळ्यात बुडून मे २०२२ मध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. विनायक निकम (वय ८), सिद्धार्थ निकम (वय ७)

, कार्तिक हिंगमिरे (वय ७) अशी मृत चिमुकल्यांची नावे होती. आई-वडील नेहमीप्रमाणे कामासाठी गेल्यावर खेळत-खेळत तिघेही शेततळ्याजवळ पोचले आणि तळ्यात पडून त्यांचा मृत्यू झाला.

(२) जानेवारी २०२२ मध्ये शेततळ्यात पाणी प्यायला गेलेल्या मार्डीतील (ता. उत्तर सोलापूर) तीन अल्पवयीन मुलींचा तळ्यात बुडून मृत्यू झाला होता.

 सानिका गरड, पूजा गरड, आकांक्षा वडजे अशी मृत मुलींची नावे होती. तिघीही तहान लागली म्हणून पाणी प्यायला त्या शेततळ्यात गेल्या होत्या.

(३) २०२५ मध्ये पाटकूल (ता. मोहोळ) येथील लोंढे कुटुंबीय कोर्टीमधील (ता. पंढरपूर) एका शेतकऱ्याकडे कामाला होते. ९ डिसेंबर रोजी शेततळ्यात पडून चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाला होता. 

याच वर्षी चोपडी (ता. सांगोला) येथील प्रियांश अजित भोसले या तीन वर्षीय चिमुकल्याचा देखील शेततळ्यात पडूनच मृत्यू झाला.

तारेचे कुंपण असल्यावर अनुदान वितरीत

'मागेल त्याला शेततळे' योजनेतून पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते. शेततळ्यात बुडून मृत्यू होऊ लागल्याने सुरक्षेसाठी तारेचे कुंपण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय अनुदान वितरित केले जात नाही.

 तरीपण, पोहायला न येणारे किंवा लहान मुले शेततळ्याकडे जाणार नाहीत, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी, जेणेकरून दुर्घटना टळतील.

- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील शेततळी

तालुका एकूण शेततळी

उत्तर सोलापूर ६९२

दक्षिण सोलापूर ८९४

मोहोळ १,४९४

अक्कलकोट ८८६

बार्शी १,१४९

माढा २,५३३

करमाळा ८७१

पंढरपूर २,४३३

सांगोला २,४६९

मंगळवेढा १,३६१

माळशिरस १,२३५

एकूण १६,०१७

प्रत्येकांनी 'हे' लक्षात ठेवाच... पोहायला न येणाऱ्या व्यक्ती, बालकाकडे विशेष लक्ष द्यावे. शेततळ्याला तारेचे कुंपण करावे, जेणेकरुन दुर्घटना होणार नाहीत. शेततळ्यात रिकामे प्लास्टिक कॅन, भोपळे टाकावेत, जेणेकरून जीव वाचू शकतो. उन्हाळा सुट्टीत लहान मुलांकडे लक्ष द्या, पालकांनी त्यांना पोहायला शिकवावे.

Post a Comment

0 Comments