google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा परिषदेत सत्कारांचा त्रिवेणी संगम; अतुल (मालक) पवार यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव

Breaking News

सोलापूर जिल्हा परिषदेत सत्कारांचा त्रिवेणी संगम; अतुल (मालक) पवार यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव

सोलापूर जिल्हा परिषदेत सत्कारांचा त्रिवेणी संगम; अतुल (मालक) पवार यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव


सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूरमध्ये मान्यवरांच्या सत्काराचा एकत्रित सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. अतुल (मालक) पवार यांच्या हस्ते तीन महत्त्वाच्या व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CO) मा. श्री. कुलदीप जंगम यांचा त्यांच्या प्रशासकीय कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्हा परिषद प्रशासन अधिक सक्षम होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

तसेच, जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी मा. श्री. इंद्रजीत पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या नेतृत्वातून जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

याचबरोबर, जिल्हा परिषद अध्यक्षपदी मा. श्री. दिपक वैद्य यांची निवड झाल्याबद्दलही त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या निवडीमुळे जिल्हा परिषदेत नव्या उर्जेने काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी तिघांच्याही कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments