google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कडलास जिल्हा परिषद गटावर महायुतीचे वर्चस्व

Breaking News

सांगोला तालुक्यातील कडलास जिल्हा परिषद गटावर महायुतीचे वर्चस्व

सांगोला तालुक्यातील कडलास जिल्हा परिषद गटावर महायुतीचे वर्चस्व


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कडलास जिल्हा परिषद गटामधून महायुतीच्या उमेदवार शोभाताई खटकाळे यांनी एकतर्फी विजय संपादन करून विक्रमी मताधिक्यांनी विरोधी उमेदवाराचा दारुण पराभव केला. 

मागच्या टर्ममध्ये उपसभापतीचे पद भूषविलेल्या व महायुतीच्या उमेदवार सौ. शोभाताई खटकाळे यांना कडलास जिल्हा परिषद गटामधून एकूण १६,६०७ एवढी मते मिळाली

 तर त्यांचे प्रतिस्पर्धी सांगोला तालुका मते विकास आघाडीचे उमेदवार संगीता शिंदे यांना ७६६३ एवढी मिळाली. म्हणजे महायुतीच्या उमेदवार सौ शोभाताई खटकाळे यांना या गटातून तब्बल ८८४४ एवढे मताधिक्य मिळाले.

कडलास जिल्हा परिषद गटांमध्ये वाटंबरे, वासुद, कडलास, अकोला, लिगाडेवाडी, अजनाळे, वझरे, चिणके, य. मंगेवाडी, कमलापूर व गोडसेवाडी या गावांचा समावेश आहे. कडलास जिल्हा परिषद गटामध्ये जेवढी गावे आहेत 

त्या सर्वच गावांमधून महायुतीच्या उमेदवार सौ शोभाताई खटकाळे यांना चांगल्या पद्धतीने मताधिक्ष्य मिळाले आहे. कडलास जिल्हा परिषद गटामध्ये एकूण ३७ मतदान केंद्र आहेत. ३७पैकी ३६ मतदान केंद्रावर

सौ. खटकाळे यांना मताधिक्य मिळाले तर मतदान केंद्र क्रमांक १२७ या एकाच मतदान केंद्रावर सांगोला तालुका विकास आघाडीच्या उमेदवार सी संगीता शिंदे यांना केवळ २९ मतांचे मताधिक्य मिळाले.

कडलास जिल्हा परिषद गटातील सर्वच गावातून महायुतीच्या उमेदवाराला दणदणीत मताधिक्य मिळाल्याने या गटांमध्ये शिवसेनेचे नेते माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांची ताकद चांगलीच वाढली 

असल्याचे दिसून येते. या गटावर शहाजीबापू पाटील यांनी आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध करून हा गट अधिक भक्कम केला आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि दिपक आबा साळुंखे पाटील गट यांच्या

 सांगोला विकास आधाडीला सौ. शोभाताई खटकाळे यांच्या ऐतिहासिक विजयामुळे जोराचा धक्का बसला आहे. या पुढच्या काळात शेकापक्षाच्या कार्यकत्यांना कडलास गटात ताकद वाढविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

सौ. शोभाताई यांच्या एकतर्फी विजयामुळे व सांगोला तालुका विकास आघाडीच्या उमेदवाराच्या दारुण पराभवामुळे नेते मंडळींनी या निकालाची कारण मीमांसा करून झालेल्या चुकांची दुरुस्ती करणे आवश्यक 

असल्याची चर्चा कार्यकत्यांमधून होत आहे. मागील टर्म मध्ये उपसभापती म्हणून काम केलेल्या सी. शोभाताई खटकाळे या नेते मंडळींच्या सहकायनि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सर्व

योजनांचा लाभ गटातील लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतील अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त केली जात आहे कडलास जि.प. गटातील चाटेंबरे

या गावात महायुतीच्या उमेदवार सौ. शोभाताई खटकाळे यांना १७३२ एवढ़ी मते मिळाली. तर त्यांचे विरोधी उमेदवार सांगोला तालु‌का विकास आघाडीचे उमेदवार सौ. संगीता शिंदे यांना ९५३ मते मिळाली. सौ. शोभाताई खटकाळे यांना ७७९ एवढे मताधिक्य मिळाले.

वासूद या गावातून सौ. सोभाताई खटकाळे यांना १४८० मते मिळाली तर सौ. संगीता शिंदे यांना ५९२ मते मिळाली. वासूद या गावातून सौ. खटकाळे यांना ८८८ मते मिळाली. 

कडलास या गावातून सौ. खटकाळे यांना ३२६७ मते मिळाली तर विरोधी उमेदवार सौ. संगिता शिंदे यांना ११९६ मते मिळाली. सौ. खटकाळे यांना कडलास गावातून २०७१ मतांचे मताधिक्य मिळाले.

अकोला या गावातून सौ. खटकाळे यांना १४७४ एवढे मताधिक्य मिळाले असून त्यांना

२६४१ मते मिळाली तर विरोधी उमेदवार सौ. शिंदे यांना ११६७ मते मिळाली.

अजनाळे या गावातून सी. खटकाळे यांना १३१७ एबढे मताधिक्य मिळाले असून त्यांना २२१४ मते मिळाली तर विरोधी उमेदबार सौ. शिंदे यांना ८९७ मते मिळाली.

वझरे या गावातून सौ. खटकाळे यांना ३४४ मिळाले, त्यांना ६५२ मते मिळाली तर विरोधी उमेदवार सौ. शिंदे यांना ३०८ मते मिळाली. चिणके या गावातून

 सौ. खटकाळे यांना ६६४ मतांचे मताधिक्य मिळाले असून त्यांना १२५१ मते मिळाली तर विरोधी उमेदवार सौ. शिंदे यांना ५८७ मते मिळाली. य. मंगेवाडी गावातून सी. खटकाळे यांना ६६३ मतांचे मताधिक्य मिळाले 

असून त्यांना १५१० एवढी मते मिळाली तर सौ. संगीता शिंदे यांना ८४७ मते मिळाली. कमलापूर या गावातून सौ. खटकाळे यांना १८६० एवही मते मिळाली तर विरोधी उमेदवार सौ. शिंदे यांना १११६ मते मिळाली, तर सौ. खटकाळे यांना ७४४ मतांचे

मताधिक्य मिळाले. कडलास पंचायत समिती गण कडलास पंचायत समिती गणामध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवार सौ. राणी पाटील यांनी 

विरोधी सांगोला तालुका विकास आघाडीचे उमेदबार श्री. धनाजी पवार यांचा विक्रमी मताधिक्यानी पराभव करून एकतर्फी विजय मिळविला. सी. राणी पाटील यांना ८९६३ एबढी मते मिळाली

 तर विरोधी उमेदवार श्री धनाजी पवार यांना ३८२९ एवढी मते मिळाली. सौ राणी पाटील यांना या गणातून ५१३४ एवढे मताधिक्य मिळाले. कडलास पंचायत समिती गणामध्ये वाटंबरे, वासुद, कडलास आणि अकोला या गावांचा समावेश आहे.

 आघाडीचे उमेदवार श्री. पवार यांना केवळ वाटंबरे या गावातच ११३ एबळे मताधिक्य मिळाले. श्री पवार यांना वाटंबरे गावातून १३८२ एवढी मते मिळाली तर महायुतीच्या उमेदवार सी. राणी पाटील यांना १२६९ मते मिळाले आहेत.

वासुद गावातून सौ. राणी पाटील यांना १२९५ एवढे मताधिक्य मिळाले असून त्यांना या गावातून विरोधी उमेदवार श्री पवार यांना मा.आ.शहाजीबापूंची ताकद वाढली १६६७ मते मिळाली तर विरोधी उमेदवार श्री पवार यांना केवळ ३७२ मते मिळाली. 

कडलास गावातून सौ. राणीताई पाटील यांना १८७९ एवढे मताधिक्य मिळाले असून त्यांना या गावातून ३११७ एवढी मते मिळाली तर अजनाळे पं. स. गणामधील एकाही गावात १ मताचे सुध्दा मताधिक्य नसताना मतांचे मताधिस्य आघाडीचे बापू जावीर १०७ मतांनी विजयी १,२३८ मते मिळाली.

 अकोला या गावांमध्ये सौ. राणी पाटील यांना २९१० एवढी मते मिळाली तर श्री. धनाजी पवार यांना ८३७ मते मिळाली म्हणजे सी. राजी पाटील यांना २०७३ एवढे मताधिक्य मिळाले आहे. कडलास पंचायत समिती गणातील विजयी

 उमेदवार सौ. राणी पाटील यांना या गणातील गोरगरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचून पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतील अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे.

अजनाळे पंचायत समिती गण

सांगोला तालुक्यातील जि.प गट व पं.स.गण निवडणुकीत भाजप शिवसेना युती असताना देखील अजनाळे पं. स. गणामध्ये मात्र प्रामुख्याने अजनाळे पं. स. गणामध्ये

प्रामुख्याने भाजप, शिवसेना आणि सांगोला तालुका विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली. भाजपतर्फे सी. शितल भङंंगे, शिवसेनेच्या वतीने सौ. मिनाक्षी केंगार आणि सांगोला तालुका विकास आघाडीकडून श्री. बापू जावीर यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत पार पडली.

 अजनाळे गणातून भाजपाच्या सौ. शितल भडंगे यांना एकूण २८५९ एवढी मते मिळाली. शिवसेनेचे उमेद‌वार सी. मिनाक्षी केंगार यांना ४०१७एवढी मते मिळाली तर सांगोला तालुका विकास आघाडीचे 

श्री. बापू जावीर बांना ४९२४ एबढी मते मिळाली. अतिशय चुरशीने पार पडलेल्या या निवडणुकीत श्री. बापू जावीर यांनी केवळ १०७मताचे मताधिक्य मिळवून शिवसेना उमेदवार स. केंगार यांचा पराभव केला, निवडणुकीचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे

 श्री. बापू जावीर यांना अजनाळे पं. स. गणातील एकाही गावात मताधिक्य मिळाले नाही. या पंचायत समिती गणातून अजनाळे, थ. मोबाडी, कमलापूर या तीन गाचांमध्ये शिवसेना उमेदवाराला मताधिक्य मिळाले तर व्हले आणि चिणके या गावात भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाले. 

या गणातील ५ गावांपैकी एकाही गावात श्री. जावीर यांना एकही मताचे मताधिक्य नसताना सुध्दा श्री. जाबीर यांनी विजयाची माळ आपल्या गळ्यात खेचून घेतली. श्री. जावीर यांच्या या विजयामुळे अजनाळे गणामध्ये

शिवसेना व भाजप उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. अजनाळे गावातून शिवसेनेच्या सौ. मिनाक्षी केंगार यांना १४३७ मते मिळाली, 

तर भाजप उमेदवार शितल भडंगे यांना एकूण ३६६ मते मिळाली. आघाडीचे बापू जावीर यांना या गावातून १२२० मते मिळाली. या तिरंगी लढतीमध्ये शिवसेनेच्या सौ. मिनाक्षी केंगार यांना २१७ एवढे मताधिक्य मिळाले.

वजरे या गावातून सौ. मिनाक्षी केंगार यांना ९४ मते, शितल भडंगे बांना ४८४ मते आणि बापू जावीर यांना ३६७ मते मिळाली. शितल भक्ती यांना ११७ मतांचे मताधिक्य मिळाले,

केंगार चिणके या गावात सौ. मिनाक्षी यांना ३२२ मते मिळाली. अजनाळे पं.स.गणाच्या सौ. भडंगे यांना ८८६ मते मिळाली तर श्री. बापू जावीर यांना ६०३ मते मिळाली. भाजप उमेदवार सौ. भङगे यांना २२३ मतांचे मताधिक्य मिळाले.

य. मंगेवाडी गावातून सौ. मिनाक्षी केंगार यांना ८९० मते मिळाली. सौ. शितल भडंगे यांना ४९९ मते मिळाली व बापू जावीर यांना ८८८ मते मिळाली. या गावातून मिनाक्षी केंगार यांना केवळ २ मताचे मताधिक्य मिळाले. 

कमलापूर या गावातून सौ. केंगार यांना १२७४ मते, भांडी यांना ६३२ मते तर जाबीर यांना १०४६ एवढी मते मिळाली. सौ. केंगार यांना या गावातून २२८ मतांचे मताधिक्य मिळाले.

Post a Comment

0 Comments