लंडनमधील Heathrow Airport (हिथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळ)
येथे महाराष्ट्र राज्यातील सुमारे १५ आमदारांचे आगमन झाले.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
अॅडव्होकेट यशराजे साळुंखे आणि चेअरमनअमजद मुलाणी मांजरी यांच्या प्रयत्नांतून लंडन येथे ही महत्त्वपूर्ण भेट घडून आली.
मूळ बामणी गावचे व सध्या लंडन येथे कायमस्वरूपी स्थायिक झालेले सॉलिसिटर नवनाथ साळुंखे यांची सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत ही उल्लेखनीय भेट संपन्न झाली.
या आगमनावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे विमानतळावर नवनाथ साळुंखे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्व आमदारांना त्यांच्या निवासस्थानी भेट देण्याचे आमंत्रण देण्यात आले.
हा क्षण आपल्या सांगोला तालुक्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. तसेच या दोघांच्या भेटीचा लाभ भविष्यात
आपल्या तालुक्याला निश्चितच होऊ शकतो, कारण दोघेही सुशिक्षित, दूरदृष्टी असलेले आणि अत्यंत साधेपणाने वागणारे व्यक्तिमत्त्व आहेत.
वयाच्या दृष्टीने देखील दोघेही तुलनेने तरुण व जवळपास समवयस्क असल्याने, त्यांच्या विचारांची सांगड घालून
भविष्यात आपल्या तालुक्याच्या विकासासाठी सकारात्मक व परिणामकारक उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा आहे.


0 Comments