google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोला - मिरज रोडवरील सूतगिरणीसमोर सीएनजी टाटा कारला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

Breaking News

खळबळजनक..सांगोला - मिरज रोडवरील सूतगिरणीसमोर सीएनजी टाटा कारला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

खळबळजनक..सांगोला - मिरज रोडवरील सूतगिरणीसमोर सीएनजी टाटा कारला आग;


अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- सांगोला–मिरज रोडवरील सूतगिरणी समोर उभी असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या सीएनजी चारचाकी वाहनाला मंगळवारी दि.17 फेब्रुवारी रात्री 

सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, सूतगिरणीसमोरील रस्त्यावर उभी असलेल्या टाटा कंपनीच्या सीएनजी कारमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच वाहनाने पेट घेतला. 

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चालक संतोष सरगर व फायरमन आसिफ काझी यांनी तत्परतेने आग विझवण्याचे काम हाती घेतले.

सदर वाहन सीएनजीवर चालणारे असल्यामुळे मोठा स्फोट होण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली आणि परिसरातील नागरिकांचा जीवितहानीचा धोका टाळण्यात यश आले.

दरम्यान, आग लागली त्या वेळी संबंधित वाहनाचा चालक व मालक घटनास्थळी उपस्थित नव्हते. तसेच वाहनाचा नोंदणी क्रमांक संशयास्पद असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

 त्यामुळे या घटनेबाबत संशय व्यक्त केला जात असून, संबंधित वाहनाची ओळख व आग लागण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास अपेक्षित आहे.

या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments