खुशखबर! 'हॉटेल महालोक' फॅमिली रेस्टॉरंटचा उद्या मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा
गळवेढा-सांगोला रोडवर काळा खडक शेजारी 'हॉटेल महालोक फॅमिली रेस्टॉरंट' उद्यापासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज होणार असून उद्या दुपारी 4 वा. उद्घाटन संपन्न होणार असल्याची माहिती संचालक शुभांगी सूर्यवंशी यांनी दिली.
उज्जैन येथील योगी बंम बंम नाथ अघोरी आखाडा चक्रवर्ती प्रमुख सोमवरनाथ महाराज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार समाधान आवताडे,
माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार शहाजीबापू पाटील सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्रमुख प्रा.मारुती नवले, मराठी अभिनेत्री अलका कुबल या मान्यवरांची उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढणार आहे.
नव्याने सुरू होत असलेल्या 'हॉटेल महालोक' फॅमिली रेस्टॉरंट हे वातानुकूलित असून ग्राहकांच्या सेवेसाठी उद्यापासून सुरू होत आहे. 'हॉटेल महालोक' फॅमिली रेस्टॉरंट परिसर अतिशय नयनरम्य निसर्ग रम्य आहे.
'हॉटेल महालोक' फॅमिली रेस्टॉरंटमध्ये व्हेज व नॉनव्हेज पद्धतीचे जेवण खवय्यांना मिळणार असून , खास चुलीवरील भाकरी, भरलं वांग
, पिठल पालेभाजी, व्हेज भुना , पनीर पसंदा , व्हेज कढाई , ताक तसेच चिकन जंजीर , चिकन हैदराबादी , चिकन मोगलाई , तंदूर रोस्ट , मटन मालवणी,
मटन हैदराबादी, मटन खिमा व इतर प्रकारचे खाद्यपदार्थ 'हॉटेल महालोक' फॅमिली रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हॉटेलची संपूर्ण इमारतमध्ये आकर्षक रंगसंगती सजावट , नैसर्गिक वातावरण , उत्तम आसन व्यवस्था , भव्य परिसर व पार्किंगच्या सुविधेसह अनेक सुखसोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
येथे आल्यानंतर खवय्यांना नक्कीच समाधान मिळेल असा विश्वास सूर्यवंशी परिवाराने व्यक्त केला.
आज मंगळवेढेरांनी 'हॉटेल महालोक' फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 'या' नंबरवर संपर्क साधावा
हॉटेल महालोक फॅमिली रेस्टॉरंटच्या संदर्भात अधिक माहितीसाठी 7070 52 6006 या नंबर वर संपर्क साधावा.


0 Comments