google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महुद जिल्हा परिषद गटात मा.बाळासाहेब ढाळे यांना‌ मोठा प्रतिसाद

Breaking News

महुद जिल्हा परिषद गटात मा.बाळासाहेब ढाळे यांना‌ मोठा प्रतिसाद



महुद जिल्हा परिषद गटात मा.बाळासाहेब ढाळे यांना‌ मोठा प्रतिसाद


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

  सध्या सांगोला तालुक्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.महुद जिल्हा परिषद गटात सुध्दा निवडणुकीचे वातावरण तापु लागले आहे.महुद जिल्हा परिषद गटात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महुद गावचे सरपंच मा.बाळासाहेब‌ ढाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले 

असुन.मा.बाळासाहेब ढाळे यांनी या अगोदर महुद गावचे सरपंच पद चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विजेचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न,घरकुलांचे प्रश्न,विविध समाजाच्या स्मशान भुमीचे प्रश्न मा.बाळासाहेब डाळे यांनी मोठ्या कोश्यल्याने मार्गी लावले आहेत.

  मा बाळासाहेब ढाळे यांनी कासाळ गंगा ओढ्याला नदीचा दर्जा मिळवुन देण्यासाठी गावातील सर्व पक्षीय नेते,सामाजीक संस्था ,अनेक नामवंत पत्रकार तसेच राज्यातील पाणी फाउंडेशन सारख्या सामाजीक संस्थांच्या 

मदतीने कासाळ नदी पुनर्जिवीत केली आहे.या कार्यामुळे मा बाळासाहेब ढाळे यांना राज्यस्तरीय जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय अनेक पुरस्कारांने गौरवण्यात आले आहे.

देशातील महत्वाचे नेते व‌ केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते मा बाळासाहेब ढाळे यांचा  गौरव करण्यात आला आहे..त्यांच्या या कामाचे कौतुक  कटफळ ते बंडीशेगाव या कासाळ नदी काठच्या गावांमध्ये झाले आहे..

  मा.बाळासाहेब ढाळे हे अत्यंत शांत स्वभावाचे व मित भाषी म्हणून ओळखले जातात.लहान असो की मोठा प्रत्येकांना ते नम्रतेने बोलत आसतात.

प्रत्येकांशी चर्चा करताना ते सहान भुतीपुर्वक ऐंकुन‌ घेत आसतात.कदीही कोणाबरोबरही ते आकस बुध्दीने वागत नाहीत.

समोर जे बोलतात तेच मागे सुध्दा बोलणार एखाद्याला उगीचच खुष करण्यासाठी वर वर बोलने त्यांचा स्वभाव नाही.ते नेहमी कोणीका असेना खऱ्याचीच बाजु घेत आसतात.त्यामुळे त्यांच्या प्रति नागरीकांमध्ये आपुलकीची भावना आहे.

‌‌मा.बाळासाहेब ढाळे हे सर्व समाजातील लोकांमध्ये मिसळून काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात.गावातील कोणताही सामाजिक कार्यक्रम असो 

की एखाद्या कुटुंबातील आनंदाचा दुःखाचा क्षण असो ते उपस्थित राहुन प्रत्येकांच्या सुख दुःखात सामील होत असतात.महुद गावांमध्ये अनेक समाजांचे लोक गुण्या गोवींदाने राहतात.

अनेक समाजांचे वेगवेगळे समाजीक कार्यक्रम असतात अनेक राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या मोठ्या थाटामाटात साजऱ्या होत असतात.या राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या मध्ये मा.बाळासाहेब ढाळे यांचा सक्रिय सहभाग असतो

.ढाळे यांनी कधीही जाती पातीच्या राजकारणाला थारा दिला नाही कधीही कोणत्याही जातीचा द्वेष केला नाही.हेच त्यांचे वेगळेपण लोकांना भावत आहे.आज मा.बाळासाहेब ढाळे हे जिल्हा परिषद निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत

 म्हटल्यावर आक्षरक्षा महुद गटांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेषता तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात उस्ताह दिसुन येत आहे.गावोगावी बाळासाहेब ढाळे यांच्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मत प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments