दुर्दैवी घटना..भरधाव कार डोंगरगाव ओढ्यात पडल्याने दोघांचा बुडून मृत्यू पाठीमागे बसलेले तिघेजण बचावले : मृतांमध्ये एक पंढरपूरचा तर दुसरा पुण्याचा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला भरधाव वेगातील कार नियंत्रण सुटून थेट ओढ्यात घुसली. या अपघातात सीटवेल्ट न निघाल्यामुळे कारमधील पुढील सीटवरचे दोघेजण पाण्यात बुडून मरण पावले,
तर पाठीमागील सीटवरील तिघे जण दैव बलवत्तर म्हणून बचावले. हा अपघात रविवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास डोंगरगाव (ता. सांगोला) ओढ्यात घडला. गौतम गुलाब सरतापे (वय ७०, मूळ रा. महूद, ता. सांगोला,
सध्या रा. शाह लॉन्स पाठीमागे, पंढरपूर) व नाथन रामचंद्र केंगार (७०, मूळ रा तिसंगी, ता. पंढरपूर, सध्या रा. पिंपरी चिंचवड, पुणे),
अशी मृतांची नावे आहेत. याबाबत, ज्ञानेश्वर ठोकळे (रा. डोंगरगाव) यांनी पोलिसांत खबर दिली असून, अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
डॉ आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था डोंगरगाव संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर,
मृत गौतम सरतापे व नाथन केंगार असे तिघेजण मिळून संस्थेच्या कामकाजासाठी जुनोनी येथे गेले होते.
तिथून काम आटोपून मृत दोघे व ललित बाबर, प्रभा सुरेंद्र यादव (रा, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा), नीता रावसाहेब आवळे (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर), सीटबेल्ट निघाला नाही...
कार ओढ्यात घुसल्याचे पाहताच संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठोकळे, माजी उपसरपंच डी. एस. कांबळे,
अॅड. सुनील जगधने, बाळासाहेब राजगे, बापू चव्हाण, अजय उथळे, सिद्धेश्वर बाबरसह स्थानिक ग्रामस्थांनी
अपघातग्रस्त कारमधील पाठीमागील सीटवरील ललित बाबर, प्रभा यादव व नीता आवळे यांना सुखरूप बाहेर काढले;
परंतु पुढच्या सीटवरील गौतम सरतापे व नाथन केंगार यांचा पाण्यात सीट बेल्ट न काढता आल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
असे पाच जण मिळून कारमधून जुनोनी-हटकर मंगेवाडी-राजगेवाडी ते डोंगरगाव गावाकडे येत होते. चालक नाथन केंगार यांचे नियंत्रण सुटलेली कार थेट गावालगत ओढ्यातील पाण्यात पडली.


0 Comments