google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सांगोल्यात भाजपला अतिआत्मविश्वास नडला…नगराध्यक्ष पदासह १५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी, शहरविकास आघाडीला ८ जागा शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने यांचा ५ हजार मतांनी विजय

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सांगोल्यात भाजपला अतिआत्मविश्वास नडला…नगराध्यक्ष पदासह १५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी, शहरविकास आघाडीला ८ जागा शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने यांचा ५ हजार मतांनी विजय

ब्रेकिंग न्यूज..सांगोल्यात भाजपला अतिआत्मविश्वास नडला…


नगराध्यक्ष पदासह १५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी, शहरविकास आघाडीला ८ जागा शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने यांचा ५ हजार मतांनी विजय 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपला अतिआत्मविश्वास नडला असून शिवसेनेने भाजपचा चक्रव्यूह भेदला आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या १५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शेकाप, भाजप व दीपकआबा गट यांच्या शहर विकास

 आघाडीला ८ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने यांचा ५ हजार १४० मतांनी विजय झाला. नगराध्यक्ष पदाची निवडणूक कमळ चिन्हावर लढवण्याचा भाजपचा अट्टाहास नडला आहे. 

शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती बनकर यांना ५ हजार १४० मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, 

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे. या निकालातून शेकाप भाजपच्या आघाडीला मतदारांनी साफ नाकारले असल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे भाजपचे नेते बाळासाहेब एरंडे यांची मुलगी तनुजा एरंडे यांचा देखील धक्कादायक पराभव झाला.

सांगोला नगरपालिकेची निवडणुक सुरूवातीपासून चर्चेत राहिली होती. दरम्यान, शेकापचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती बनकर 

यांचा भाजप प्रवेश करून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वेगळी खेळी खेळली. शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, 

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी एकत्रित येऊन शहर विकास आघाडी स्थापन केली. तर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेकडून आनंदा माने यांना उमेदवारी दिली. प्रचारादरम्यान, एकमेकांवर टीका करताना प्रचाराची पातळी खालावली 

असल्याचे परिणाम निकालात दिसून आले. विशेष म्हणजे भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतल्या.

सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांकडे पूर्णपणे पाठ फिरवून भाजपच्या नेत्यांच्या अनेक वक्तव्यांतून जाणवणारा अहंकाराचा दर्प, त्यातून बळावलेली मतदारांना गृहीत धरण्याची वृत्ती यामुळे भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. 

मतदारांना गृहीत धरणे, अति आत्मविश्वास, लादण्यात आलेला उमेदवार, त्यातून निर्माण झालेली नाराजी, निवडणुकीत अवलंबलेली साम, दाम, दंड, रणनीती, मतदारांना दाखविण्यात आलेली प्रलोभने,

 वैयक्तिक जनसंपर्काचा अभाव आदी कारणांमुळे तसेच शेकाप आणि भाजपच्या आघाडीला मतदारांनी नाकारल्याने सांगोला नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मारुती बनकर यांचा तब्बल ५ हजाराहून अधिक मतांनी दारुण पराभव झाला.

सांगोला नगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे…

नगराध्यक्ष

आनंदा गोरख माने – १३६६८ विजयी

मारुती बनकर ८५२८

विश्वेश झपके २७७५

प्रभाग क्रमांक १ अ –

माने राणी आनंदा – बिनविरोध

प्रभाग क्रमांक १ ब –

मदने रामचंद्र बापू ११७५ विजयी

प्रभाग क्रमांक २ अ –

धनवजीर प्रशांत बबन १६६० विजयी

प्रभाग क्रमांक २ ब –

सावंत वैशाली सतिश १५०७ विजयी

प्रभाग क्रमांक ३ अ –

बनसोडे गोदाबाई भारत ८२६ विजयी

प्रभाग क्रमांक ३ ब –

पाटील अरूण विलास ४९० विजयी

प्रभाग क्रमांक ४ अ –

यावलकर आशादेवी सोमेश्वर १६०० विजयी

प्रभाग क्रमांक ४ ब –

तेली ज्ञानेश्वर बाळकृष्ण १२३७ विजयी

प्रभाग क्रमांक ५ अ –

गावडे काशिलिंग दगडू १२७२ विजयी

प्रभाग क्रमांक ५ ब –

मेटकरी छाया सुर्यकांत १४१८ विजयी

प्रभाग क्रमांक ६ अ –

सरगर सिमा समाधान  ११७७ विजयी

प्रभाग क्रमांक ६ ब –

राऊत चैतन्य ज्ञानू ११९८ विजयी

प्रभाग क्रमांक ७ अ –

बनकर गणेश शिवाजी ११०१ विजयी

प्रभाग क्रमांक ७ ब –

फुले शोभा निवृत्ती  ९२६ विजयी

प्रभाग क्रमांक ८ अ –

साबळे श्रध्दा रवीप्रकाश १०१६ विजयी

प्रभाग क्रमांक ८ ब –

जाधव रमेश पांडुरंग १२५७ विजयी

प्रभाग क्रमांक ९ अ –

मुजावर जुबेर इकबाल ११५२ विजयी

प्रभाग क्रमांक ९ ब –

दौंडे दिव्यांनी सौरभ  ११६० विजयी

प्रभाग क्रमांक १० अ –

झपके वैशाली सिध्दार्थ ११७० विजयी

प्रभाग क्रमांक १० ब –

पाटील विवेक दिलीप १०८५ विजयी

प्रभाग क्रमांक ११ अ –

केदार सावंत सुजाता चेतनसिंह – बिनविरोध

प्रभाग क्रमांक ११ ब –

केदार अनिता निलेश १८१२ विजयी

प्रभाग क्रमांक ११ क –

इंगोले नितिन विठ्ठल १८६१ विजयी

Post a Comment

0 Comments