google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'माझ्यावर दबाव होता...', निकालानंतर एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सगळंच केलं उघड, 'एकटं पाडलं अन्...' अँड.आ.शहाजीबापू पाटील

Breaking News

'माझ्यावर दबाव होता...', निकालानंतर एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सगळंच केलं उघड, 'एकटं पाडलं अन्...' अँड.आ.शहाजीबापू पाटील

'माझ्यावर दबाव होता...', निकालानंतर एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सगळंच केलं उघड, 'एकटं पाडलं अन्...' अँड.आ.शहाजीबापू पाटील


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला नगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला विजय मिळाला आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपला गड राखला आहे.

 या विजयानंतर प्रतिक्रिया देताना, शिवसेनेला एकाकी पाडलं होतं असं स्पष्टपणे सांगून टाकलं.तसंच एकनाथ शिदेंनी प्रचाराचा नारळ फोडल्याने आपल्यावर प्रचंड दबाव आला होता असंही म्हटलं आहे. 

सांगोल्यात शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने हे विजयी झाले आहेत. तसंच नगरपालिकेच्या नगरसेवकांमध्ये सुद्धा शिवसेनेचे नगरसेवक विजयी झाले आहेत.

शिवसेनेला एकाकी पाडलं अन्...

"प्रचार करतानाच ही निवडणूक जनतेने हातात घेतली असल्याचं लक्षात आलं होतं. कोणत्याच नेत्याच्या हाती ही निवडणूक राहिली नव्हती. शिवसेनेला एकाकी पाडलं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्याने अचानक कमळ हाती घेतलं. 

त्या दोन गोष्टींचा परिणाम या ठिकाणी दिसून येत आहे. त्यातूनच अशा भरघोस मताने शिवसेनेच्या बाजूने निकाल लागताना दिसत आहे," अशी प्रतिक्रिया शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.

'एकनाथ शिंदेंमुळे दबाव होता'

पुढे ते म्हणाले, "एकनाथ शिंदेंचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. त्यांना माझ्याबद्दल जिव्हाळा आहे. ते प्रचाराचा नारळ फोडायला आले तेव्हाच माझ्यावर दबाव आला होता. 

या दबावात मी होतो की, साहेबांनी नारळ फोडला असल्याने शिवसेनेचा विजय होणं आवश्यक आहे.

 मी सर्व कार्यकर्त्यांना याची जाणीव करुन देत होतो की, साहेबांनी नारळ फोडला असल्याने गुलालाशिवाय पर्याय नाही. आणि माझ्या कार्यकर्त्यांनी, जनतेने शिवसेनेला विजय मिळवून दिला. आम्ही एकनाथ शिंदेंच्या विश्वासाला पात्र ठरलो".

भाजपाला शिंगावर घेणाऱ्या शहाजीबापू पाटलांचा काय निकाल लागला?

प्रचारादरम्यान शहाजीबापू पाटील यांनी भाजपावर टीका करताना, एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा प्रकारचं भाजपाचं वागणं मला दिसत आहे असं म्हटलं होतं.

 अशा प्रकारचं राजकारण वैभवशाली महाराष्ट्राच्या परंपरा थोड्या दिवसात उद्ध्वस्त करेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.

"आज हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा प्रकारचं भाजपाचं वागणं मला दिसत आहे. 

असं राजकारण महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली महाराष्ट्राच्या परंपरा थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या दिसतील," असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं होतं.

Post a Comment

0 Comments