google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज निवडणूक निर्णय अधिकारी मा. सैपन नदाफ

Breaking News

सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज निवडणूक निर्णय अधिकारी मा. सैपन नदाफ

सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज निवडणूक निर्णय अधिकारी मा. सैपन नदाफ


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ ची मतदान प्रक्रिया ०२ डि‌सेंबर रोजी पार पडली असून निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार मतमोजणी

 २१ डिसेंबर रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे होणार आहे.

 सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ नगराध्यक्ष पदासाठी व एकूण २१ सदस्य जागांसाठी ०२ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात ७७.७०% मतदान झाले. 

तसेच जागा क्र. १अ व ११अ साठी एकच नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिल्याने 

सदर जागांकरीता मतदान प्रक्रिया पार पडली नाही. मतमोजणीकरिता एकूण ६४ अधिकारी, 

कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी

 प्रशिक्षण १८ डिसेंबर रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर येथे पार पडले. पोलीस प्रशासनामार्फत मतमोजणी 

बंदोबस्ताकरीता मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असून मतमोजणी ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे‌. 

मतमोजणी प्रतिनिधी यांना ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नसून मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणण्यास प्रतिबंध केला आहे. 

मतमोजणीकरीता प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ यांनी दिली.

Post a Comment

0 Comments