google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला वेळापूर रोडवरील निरा कालव्या रोड जवळ दुधाचा टॅंकरने पिकअपला दिली जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू तर १० जण गंभीर जखमी

Breaking News

सांगोला वेळापूर रोडवरील निरा कालव्या रोड जवळ दुधाचा टॅंकरने पिकअपला दिली जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू तर १० जण गंभीर जखमी

सांगोला वेळापूर रोडवरील निरा कालव्या रोड जवळ दुधाचा टॅंकरने


पिकअपला दिली जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू तर १० जण गंभीर जखमी

(शब्दरेखा एक्सप्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

वेळापूर - सांगोला वेळापूर रोडवरील निरा कालव्या रोड जवळ १५ ते २० जणांच्या जमावावर दुधाचा टँकर गेल्याने अपघात होऊन यामध्ये दहा जण गंभीर जखमी झाले 

असून यामध्ये किसन चंद्रकांत सूर्यवंशी राहणार भिगवन तालुका इंदापूर व चेतन विलास पवार राहणार आसू तालुका फलटण जिल्हा सातारा या २ जणांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे 

.फळवणी वेळापूर रोडवर फळवणी निराकालवा आवताडेवस्ती जवळ पिकअप व जड ऊस वाहतुक ट्राॅक्टरचा मागून धडक दिली याचा जोराचा आवाज झाला तेथे राहणारे भाग्यवंत अवताडे हनुमंत अवताडे रत्नाजीत 

अवताडे समाधाना अवताडे व स्थानिक ग्रामस्थ जमले सर्वांनी मिळून ड्रायव्हरला पिकअप मधून बाहेर काढले दोन्ही वाहनांच्या अपघाताचा वाद रोडलगत जमाव मिटवत असतानाच

अचानकपणे राञी १०:१५ च्या सुमारास सांगोल्याकडून तेलंगणा येथील असलेला सांगोला ते पुणे दुधाची वाहतूक करणारा टॅंकरनंबर tn28 bc ९१ ७८ हा येत होता सदर या ठिकाणी १५ ते २० जणांचा जमाव दोन्ही वाहनांमधील भांडणे मिटवत असताना अचानक पणे वेगाने

सांगोला कडुन वेगाने आलेला दुधाचा टॅंकर पिकअप ला जोरदार धडक देऊन पिकअप समोर उभे असलेले जमावामध्ये घुसूला त्यामध्ये जण १० गंभीर तर आनेकजण किरकोळ जखमी झाले आहेत.

तसेच यावेळी हनुमंत आवताडे वय ५५ यांना डोक्याला जबर मार लागला.

सदर घटनेची माहीती वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांना मिळताच ते स्वतः तातडीने पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस उपनिरीक्षक प्रणित कांबळे, कर्मचारी नितीन लिंगडे

 संदीप पाटील गणेश माळी, तानाजी लिंगडे, नितीन माळी, कर्मचाऱ्यासह अपघात स्थळी पोहचले असता अपघाताची गंभीरता एवढी मोठी होती की दुधाचा टँकर घुसल्याने गेल्याने १० पेक्षा जादा लोकांना लागल्याचे दिसून आले.

लागलीच पोलीस कर्मचारी समवेत मदत करून वाहनांची व्यवस्था करून जखमींना अकलूज येथे ५ जण ,पंढरपूर येथे लाईफ लाईन येथे १ जण, कॉटेज पंढरपूर येथे ३ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले

 त्याचबरोबर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे काही जणांना दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये ओंकार आवताडे 

प्रमोद आवताडे समाधान ढेकळे दत्तात्रय ढेकळे शंकर हिरवे रोहित आवताडे अभिजीत आवताडे सर्व राहणार फळवणी तसेच शिंदेवाडी तालुका माळशिरस येथील अभिषेक शिंदे चंद्रकांत 

जाधव सोनू मसगुडे हेही जखमी झाले आहेत या घटनेची वेळापूर पोलीस स्टेशनला दूध टँकर चालक याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याचा अधिक तपास भाऊसाहेब गोसावी हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments