सांगोल्यात दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे महिनाभर मोफत मूत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोला शहरातील जय भवानी चौक येथे असलेल्या दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे
महिनाभर चालणाऱ्या मोफत मूत्ररोग निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर ११ मार्च ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.
या शिबिरात सांगली येथील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉ. आदिन चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची मोफत तपासणी, निदान व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये मूत्ररोग, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मूत्राशयाचे आजार, किडनीचे आजार,
किडनीतील व मूत्रवाहिनीतले खडे, मूत्राशयातील खडे तसेच लघवीसंबंधित विविध समस्या जसे वारंवार लघवी होणे,
लघवीच्या मार्गातील अडथळे, लघवी न होणे आदी आजारांवर तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे.
रुग्णांनी तपासणीसाठी येताना जुने वैद्यकीय रिपोर्ट व फाईल्स सोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या रुग्णांना मूत्ररोगासंबंधित शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आलेला आहे, अशा रुग्णांसाठी केशरी, पिवळे व पांढरे रेशन कार्डधारकांना महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना
आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना अंतर्गत दुर्बिणीद्वारे (एंडोस्कोपी पद्धतीने) मुतखडा व इतर शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याच शिबिरामध्ये आयुष्यमान कार्ड काढून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यासाठी ऑनलाईन रेशन कार्ड अथवा १२ अंकी रेशन कार्ड नंबर व आधार कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
सोलापूर व सांगली जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, आटपाडी, जत, पंढरपूर आदी तालुक्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांनी
या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क : ९१४५१२४५७९.


0 Comments