google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात श्री अंबिकादेवी यात्रेनिमित्त भव्य शेतीमाल प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन

Breaking News

सांगोल्यात श्री अंबिकादेवी यात्रेनिमित्त भव्य शेतीमाल प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन

सांगोल्यात श्री अंबिकादेवी यात्रेनिमित्त भव्य शेतीमाल प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन


(शब्दरेखा एक्सप्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती सांगोला व कोर्ट रिसीव्हर्स यांच्या वतीने सालाबादप्रमाणे (रथसप्तमी) श्री अंबिकादेवीच्या यात्रेनिमित्त शेतीमालाचे

 प्रदर्शन व विविध स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती कोर्ट रिसिव्हर्स श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती सांगोला यांनी दिली आहे.येत्या सोमबार, 

१९ जानेवारी ते बुधबार, २८ जानेवारी रोजी या कालावधीत भरविण्यात येणाऱ्या यात्रेची सुरुवात सोमवार, १९ जानेवारी रोजी श्री देवीची सवाद्य मिरवणूक सायंकाळी पाच बाजता,

 मंगळवार, २० रोजी व बुधवार, २१ रोजी सलग दोन दिवस शेळ्या मेंढ्या व सर्व जनावरे व बैल बाजार, गुरुवार,२२ रोजी खिलार जनावरांचे प्रदर्शन, शुक्रवार, २३ रोजी व शनिवार,

 २४ रोजी सर्व प्रकारचा बाजार व विविध स्पर्धा, रविवार, २५ रोजी रथसप्तमी निमित्त श्री अंबिका देवीची महापूजा, 

महानैवेद्य व रात्री नऊ वाजता भजन गायन कार्यक्रम, सोमबार, २६ रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान दुपारी ४ वाजता, मंगळवार, 

२७ रोजी सकाळी १० वाजता शेतीमालाची निवड, बुधवार, २८ रोजी सायंकाळी पाच वाजता बक्षीस वितरण समारंभ, 

श्री अंबिका देवी पालखीची यात्रेतून मिरवणूक व सायंकाळी सात वाजता शोभेचे नयनरम्य दारूकामाने यात्रेची सांगता होणार

 असल्याचे माहिती कोर्ट रिसिव्हर्स अॅड. सारंग वांगीकर, अॅड. विक्रांत बनकर, अॅड. विशालदीप बाबर, अॅड. नितीन बाबर, अॅड. महेंद्र पत्की, अॅड. शशीकला खाडे यांनी दिली आहे.

आज होणार जागा वाटप

यात्रेसाठी गेल्या दोन दिवसांपासून मार्केट यार्ड पटांगणामध्ये विविध व्यवसायासाठी जागा वाटप करण्यात आले. शनिवारी मंदिर परिसरातील जागा वाटप होणार

 असून रविवार, २५ रोजी आठवडा बाजार यात्रा परिसरात भरणार आहे. यात्रा परिसरात कोणत्याही अवैध धंद्यांना परवानगी दिली जाणार नाही.

Post a Comment

0 Comments