सांगोला तालुक्यात ७ जि.प.गट व १४ पं.स.गणासाठी २७४ मतदान केंद्र कु.बाळुताई भागवत, सहा.निवडणुक निर्णय अधिकारी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ चा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुषंगाने आदर्श आचार संहिता लागु झालेली आहे.
सांगोला तालुक्यात ७ जि.प.गट व १४ पं.स.गणासाठी २७४ मतदान केंद्र असल्याची माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती सहा.निवडणुक निर्णय अधिकारी तथा सांगोला तहसिलदार बाळुताई भागवत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सांगोला तालुक्यामध्ये महुद बु, एखतपूर, जवळा, कडलास, चोपडी, कोळा, घेरडी हे ७ जिल्हा परिषद गट तसेच महुद बु, चिकमहुद, वाकी शिवणे, एखतपुर, वाढेगाव, जवळा, कडलास, अजनाळे, राजुरी, चोपडी, कोळा,
हत्तीद, सोनंद, घेरडी हे १४ पंचायत समिती गण आहेत. गुरुवार दि.१५ जानेवारी रोजी तहसील कार्यालय, सांगोला येथे राजकीय पक्ष व प्रमुख यांची आदर्श आचार संहिता अंमलबजावणी व निवडणुकीबाबत बैठक घेऊन
नामनिर्देशन अर्ज, त्यासोबत जोडावयाचे प्रपत्रे, छाननी, उमेदवार माघार, निवडणुक चिन्ह वाटप, मतदान दिवशी घ्यावयाची खबरदारी, अनामत रक्कम, मतमोजणी आदर्श आचार संहितेचे पालन करणेबाबत माहिती देण्यात आली
असल्याची माहिती सहा.निवडणुक निर्णय अधिकारी बाळुताई भागवत यांनी दिली. यावेळी सांगोला निवासी नायब तहसिलदार सोमनाथ साळुंखे उपस्थित होते.
सांगोला तालुक्यात ७ जि.प.गट व १४ पं.स.गण याची निवडणूक पार पडणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासन सज्ज असून सर्व निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व तपासणी करून विविध परवानगी देण्यात येणार आहेत.
- बाळुताई भागवत, सहा.निवडणुक निर्णय अधिकारी


0 Comments