google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आलेगावात भक्तीभावाचा जल्लोष! श्री सिद्धनाथ मंदिर येथे पौर्णिमेनिमित्त जि.प. सदस्य मा. श्री. अतुल (मालक) पवार यांच्या मित्रपरिवाराकडून भव्य महाप्रसादाचे आयोजन

Breaking News

आलेगावात भक्तीभावाचा जल्लोष! श्री सिद्धनाथ मंदिर येथे पौर्णिमेनिमित्त जि.प. सदस्य मा. श्री. अतुल (मालक) पवार यांच्या मित्रपरिवाराकडून भव्य महाप्रसादाचे आयोजन

आलेगावात भक्तीभावाचा जल्लोष! श्री सिद्धनाथ मंदिर येथे पौर्णिमेनिमित्त जि.प. सदस्य


मा. श्री. अतुल (मालक) पवार यांच्या मित्रपरिवाराकडून भव्य महाप्रसादाचे आयोजन 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

आलेगाव : ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ मंदिर परिसरात पौर्णिमेच्या पावन निमित्ताने भक्तीभावाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला.

 नुकतेच निवडून आलेले जि.प. सदस्य मा. श्री. अतुल (मालक) पवार यांच्या मित्रपरिवाराकडून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. 

मंत्रोच्चार, आरती आणि भक्तिगीतांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

 महाप्रसादासाठी ग्रामस्थ, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे सामाजिक एकोपा आणि धार्मिक परंपरेला बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. 

“लोकप्रतिनिधी फक्त विकासकामांपुरते मर्यादित न राहता धार्मिक व सामाजिक उपक्रमांतही पुढाकार घेत आहेत, 

ही समाधानाची बाब आहे,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.

मा. अतुल (मालक) पवार यांच्या मित्रपरिवाराने केलेल्या या आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत असून, आलेगावात पौर्णिमेचा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments