google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात गुटखा माफियांचा सुळसुळाट; गटनेते प्रशांत धनवजीर आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा

Breaking News

सांगोल्यात गुटखा माफियांचा सुळसुळाट; गटनेते प्रशांत धनवजीर आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा

सांगोल्यात गुटखा माफियांचा सुळसुळाट; गटनेते प्रशांत धनवजीर आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहर आणि ग्रामीण भागात गुटखा माफियांचे जाळे अत्यंत वेगाने पसरत असून, या अवैध व्यवसायामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे.

 या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेता, सांगोला नगरपरिषदेचे नगरसेवक तथा गटनेते मा. प्रशांत बबन धनवजीर यांनी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. 

जर या गुटखा तस्करांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर कार्यकर्त्यांसह 

अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी पत्राद्वारे दिला आहे.

तरुण पिढी कर्करोगाच्या विळख्यात

 प्रशांत धनवजीर यांनी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध सुरक्षा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

 की, सांगोला शहर व ग्रामीण भागात काही सराईत गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांनी मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी करत आहेत. 

या अवैध विक्रीमुळे तरुण मुले आणि अज्ञानी बालकं व्यसनाच्या आहारी जात असून त्यांना कर्करोगासारखे कधीही न बरे होणारे

 गंभीर आजार जडू लागले आहेत. ही बाब समाजासाठी अत्यंत घातक असून प्रशासनाने याची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.

अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाचा आरोप

 या माफियावर यापूर्वी अनेकदा गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, जामिनावर बाहेर येताच हे तस्कर पुन्हा नव्या जोमाने आपला व्यापार सुरू करतात. 

यामागे अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याचा खळबळजनक आरोपही धनवजीर यांनी या पत्रात केला आहे.

मंत्रालयापर्यंत धाव 

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून धनवजीर यांनी या तक्रारीच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्यासह सोलापूर, 

सांगली आणि पुणे विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनाही पाठवल्या आहेत. गुटखा माफियांच्या मुसक्या न आवळल्यास जनहितार्थ तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments