google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्त्रीजन्माचे स्वागत : दर महिन्याच्या 15 तारखेला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर ! ओपीडी फी : खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा नावीन्यपूर्ण उपक्रम

Breaking News

स्त्रीजन्माचे स्वागत : दर महिन्याच्या 15 तारखेला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर ! ओपीडी फी : खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा नावीन्यपूर्ण उपक्रम

स्त्रीजन्माचे स्वागत : दर महिन्याच्या 15 तारखेला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर !



ओपीडी फी : खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा नावीन्यपूर्ण उपक्रम

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला | प्रतिनिधी सांगोला येथील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कडलास रोड येथे स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी एक अभिनव व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कन्यारत्नाचा जन्म झाल्यास

 नॉर्मल डिलिव्हरीचे हॉस्पिटल बिल पूर्णपणे माफ, तर सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास बिलामध्ये विशेष सवलत देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम अमर्यादित काळासाठी सुरू राहणार आहे.

जन्मजात बालकाला काचेमध्ये (NICU) ठेवण्याची आवश्यकता भासल्यास मोफत उपचार, तसेच बाळ रडले नसल्यास, कावीळ झाल्यास, कमी दिवसांचे बाळ असल्यास, आई व नवजात बालकाचे सर्व उपचार एका छताखाली

 उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सांगोला परिसरात आई व बाळासाठी एकत्रित उपचार देणारे हे एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.

या हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PM-JAY), आयुष्मान भारत, तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. 

अनुभवी तज्ज्ञ डॉ. स्वाती खंडागळे व डॉ. परेश खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सुविधा रुग्णांसाठी खुल्या आहेत.

याशिवाय दर महिन्याच्या 15 तारखेला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात येते. या दिवशी OPD फी पूर्णपणे मोफत असून, 

योजनेत समाविष्ट नसलेल्या उपचारांसाठीही अल्पदरात रक्ततपासणी, मेडिकलमध्ये सवलत, तसेच X-Ray व ECG वर 50% सवलत देण्यात येते. गरोदर मातांच्या सोनोग्राफीवरही 50% सवलत उपलब्ध आहे.

स्त्रीजन्माला प्रोत्साहन देणारा आणि सामान्य नागरिकांसाठी आरोग्यसेवा सुलभ करणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडविणारा ठरत असून, नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.

📍 पत्ता : खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कडलास रोड, सांगोला

📞 संपर्क : 7588506196 / 8999611622

Post a Comment

0 Comments