google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चोपडी गटात राजकीय वातावरण तापले स्थानिक उमेदवार द्या, बाहेरचा नको..- शिक्षक नेते कोंडीबा वाघमारे

Breaking News

चोपडी गटात राजकीय वातावरण तापले स्थानिक उमेदवार द्या, बाहेरचा नको..- शिक्षक नेते कोंडीबा वाघमारे

चोपडी गटात राजकीय वातावरण तापले स्थानिक उमेदवार द्या, बाहेरचा नको..- शिक्षक नेते कोंडीबा वाघमारे


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

नाझरे प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून, अनेक राजकीय पैलवान मैदानावर शड्डू ठोकून उतरण्याच्या तयारीत आहेत व अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.

 परंतु चोपडी गटात जिल्हा परिषदेसाठी स्थानिक उमेदवार द्या बाहेरचा नको असे मत शिक्षक नेते कोंडीबा वाघमारे यांनी नाझरे ता. सांगोला येथे युवक संवाद मेळाव्याच्या मेळाव्याच्या बैठकी प्रसंगी व्यक्त केले 

व यामुळे चोपडी गटात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सदर बैठक युवा नेते, मा. उपसरपंच रविराज शिंदे व युवा नेते अजिंक्य शिंदे यांनी आयोजित केली होती व यामध्ये गटातील युवकाचा संवाद साधण्यात आला. 

      सध्याचे राजकारण हे बंद दाराआड सुरू असून, यामध्ये युवकांना विचारात घेतले जात नाही व चोपडी गटात लढणारे भरपूर आहेत

 मग गटातला उमेदवार द्या, बाहेरचा देऊ नका व युवकांनी आपल्या मातीतील माणसास साथ द्या व आम्ही या मातीतील माणसे आहोत

 काचेतील नाही असा टोलाही युवा नेते अजिंक्य शिंदे यांनी मारला. शिंदे घराण्याने आतापर्यंत जातीपातीचे राजकारण केले नाही व यासाठी तरुणांना विचारात घेऊन निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे 

व लवकरच मेळावा घेऊ. व या अगोदर दोन वेळा विजय दादाचा पराभव झाला व आता विजयाची संधी आहे त्यासाठी एक वेळ संधी द्या त्याचे सोने करू असेही अजिंक्य शिंदे यांनी सांगितले. 

सदर प्रसंगी ज्येष्ठ नेते मुरलीधर धायगुडे यांनी विजय दादा, रवी व अजिंक्य यांना आमचा पाठिंबा राहील तसेच सरपंच ज्ञानेश्वर राऊत यांनीही शिवसेना पक्ष नेत्यांनी उमेदवारी देताना विचार करावा असे सांगितले. 

      यावेळी युवा नेते आकाश यादव, रमेश खरात, वैभव लवटे, हर्षद शिंदे, अनिल खांडेकर, कल्पेश महाराज, बापू आईवळे, निशांत जाधव, करण माने इत्यादींनी उमेदवार स्थानिक द्या बाहेरचा नको 

व शिंदे कुटुंबात साथ देऊ असे सांगितले व मोर्चे बांधणी स आम्ही सर्व युवक तयार आहोत असे ठासून सांगितले. यावेळी ग्राम. सदस्य जीवन वाघमारे, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वांचे स्वागत व आभार अजिंक्य शिंदे यांनी मानले.

*____________________________*

    विजय दादा हे आमचे दैवत आहे व त्यामुळे अर्ज भरताना दादाचा व माझा भरणार आहे परंतु यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करू नये. 

*युवा नेते, मा. उपसरपंच रविराज शिंदे

Post a Comment

0 Comments