google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र संपन्न

Breaking News

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र संपन्न

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र संपन्न


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 सांगोला / प्रतिनिधी -  शनिवार दि. 17 जानेवारी रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोलामध्ये बी.एस्सी(ई.सी.एस)  विभागाच्या वतीने  

'इनोव्हेटिव्ह टूल्स फोर एनहॅनसिंग रिसर्च पेपर रायटिंग एफिशियन्सी'  या विषयावरती एक दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 

या चर्चासत्राचे उद्घाटन  डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी युनिव्हर्सिटी पुणे येथील प्रा.डॉ.गोपाळ साकरकर यांच्या हस्ते करण्यात आले. चर्चासत्राच्या उद्घाटनास प्रमुख उपस्थिती 

म्हणून डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी युनिव्हर्सिटी पुणे येथील डॉ. विकास मगर, महाविद्यालयाचे आय.क्यू.ए.सी कॉर्डिनेटर डॉ.शंकर धसाडे, संगणकशास्त्र

 विभागाचे विभागप्रमुख प्रा.कोळवले एच.डी, चर्चासत्र समितीचे समन्वयक प्रा.भानवसे डी.पी.हे उपस्थित होते.

    उदघाटन समारंभाचा कार्यक्रम संपल्यानंतर टेक्निकल सेशन भाग एक यामध्ये  प्रा.डॉ.गोपाळ साकरकर सरांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यामध्ये 

त्यांनी रिसर्च पेपर कशा पद्धतीने लिहिला जातो, त्या रिसर्च पेपरमध्ये कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या असाव्यात?  

व कोणत्या गोष्टी नसाव्यात ? याची माहिती सविस्तरपणे दिली. टेक्निकल सेशन भाग दोन यामध्ये  डॉ. विकास मगर यांनी अनमोल

 असे मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी असे सांगितले कि रिसर्च पेपर लिहीत असताना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग 

कशा पद्धतीने करावयाचा व कोणत्या पद्धती आत्मसात कराव्यात याची सखोल माहिती सांगितली. या चर्चासत्रासाठी संस्थेचे 

अध्यक्ष डॉ. अनिकेत(भैय्या) देशमुख, संस्थेचे सचिव मा.विठ्ठलराव शिंदे सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी व संस्थेचे सर्व सदस्य यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

       हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी संगणकशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले 

असून कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.शेख एन.एस. व प्रा.सौ. सुर्यवंशी ए.पी. यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. शिंदे डी.आर. यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments