महिलांच्या हक्कांचा बुलंद आवाज! सोनंद पंचायत समिती गणात डॉ. सौ. स्वाती परेश खंडागळे यांची दमदार एन्ट्री
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोनंद | विशेष प्रतिनिधी सोनंद पंचायत समिती गणात आता केवळ निवडणूक नाही, तर महिलांच्या सन्मानासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी थेट लढाई सुरू झाली आहे.
महिलांच्या आरोग्यापासून स्वावलंबनापर्यंत आणि मूलभूत सुविधांपासून सामाजिक न्यायापर्यंत ठोस कृतीचा अजेंडा घेऊन डॉ. सौ. स्वाती परेश खंडागळे यांनी मैदानात जोरदार एन्ट्री केली आहे.
वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या महिलांसाठी आता फक्त घोषणा नाही, तर थेट कृती होणार असल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. महिलांसाठी मोफत वैद्यकीय सेवा, ग्रामीण महिलांसाठी आरोग्याचा किल्ला मजबूत करण्याचा निर्धार आणि गरजू महिलांसाठी तत्काळ मदतीची हमी त्यांनी दिली आहे.
महिलांना फक्त लाभार्थी न ठेवता निर्णयक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा ठाम निश्चय करत, बचतगटांची स्थापना,
उद्योग-व्यवसायासाठी विशेष प्रयत्न आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा आक्रमक रोडमॅप त्यांनी जाहीर केला आहे.
केवळ महिला नव्हे, तर सोनंद गणातील प्रत्येक नागरिकाच्या अडचणींवर थेट घाव घालणार असा इशाराही त्यांनी दिला. रस्ते असोत की पाणी, लाईट असो की मूलभूत सुविधा – आता फाईलवर नाही, तर जमिनीवर काम दिसणार असे त्यांनी ठणकावून सांगितले.
“पंचायत समिती म्हणजे खुर्ची नव्हे, तर कुटुंब” या विचारातून सोनंद पंचायत समिती एक परिवार म्हणून कार्य करणार असल्याचा निर्धार व्यक्त करत,
समाजातील आर्थिक ओझे कमी करण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन हा धाडसी सामाजिक उपक्रम राबविला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
डॉ. सौ. स्वाती खंडागळे म्हणाल्या,
“जनतेचा विश्वास हा आमचा आदेश आहे. गणातील प्रत्येक नागरिकासाठी आमचे संपूर्ण कुटुंब २४ तास रस्त्यावर उतरून काम करेल. आता शब्द नाहीत, काम बोलेल!”
महिलांच्या नेतृत्वावर विश्वास, कुटुंबवत्सल दृष्टिकोन आणि थेट कृतीचा निर्धार घेऊन डॉ. सौ. स्वाती परेश खंडागळे यांची उमेदवारी सोनंद पंचायत समिती गणात राजकीय समीकरणे बदलणारी ठरत आहे.


0 Comments