google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीसांची धडक कामगिरी सन २०२५ मध्ये सांगोला तालुक्यातील अवैध्य व्यवसायांवर कारवाई करुन लाखो रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला व सराईत गुन्हेगार यांचेवर स्थानबध्द व हद्दपारीची कारवाई

Breaking News

सांगोला पोलीसांची धडक कामगिरी सन २०२५ मध्ये सांगोला तालुक्यातील अवैध्य व्यवसायांवर कारवाई करुन लाखो रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला व सराईत गुन्हेगार यांचेवर स्थानबध्द व हद्दपारीची कारवाई

सांगोला पोलीसांची धडक कामगिरी सन २०२५ मध्ये सांगोला तालुक्यातील अवैध्य व्यवसायांवर कारवाई करुन


लाखो रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला व सराईत गुन्हेगार यांचेवर स्थानबध्द व हद्दपारीची कारवाई

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच जेष्ट नागरी, पुरुष, महिला, विद्यार्थी, नवयुवक यांच्या मनामध्ये कोणत्याही गुन्हेगाराविषयी भिती, दहशत निर्माण होणार नाही. 

तसेच कॉलेज मधील शिक्षण घेत असलेल्या युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवृतीचे लोकांकडे पाहुन आकर्षन वाटुन ते गुन्हेगारी प्रवृतीकडे वळू नये, या करीता आम्ही सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील मालाविषक, शरीराविषयक, महिलाविषयक तसेच

 इतर अवैध्य धंद्याविषयी गुन्हे करणारे सराईत आरोपीतांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. पोलीस ठाणे हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी आम्ही सराईत गुन्हे, जुगार, गौण खनिज, शरीराविषयक, 

महिलाविषयक विनयभंग, शासकीय नोकरीवरील हल्ले, खुन, अॅट्रॉसिटी अॅक्ट, फसवणुक अशा वैगवेगळ्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असलेल्या व त्यांच्या परिसरातील लोकांना त्रास देणाऱ्या सराईत आरोपीविरुध्द तक्रार देण्यास कोणी धजावत नव्हते

. व ज्या इसमाच्या विरुध्द १ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. व त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे समाजातील लोकामध्ये दहशत निर्माण झालेली आहे. अशा आरोपीतांवर खालील वेगवेगळ्या हेड खाली कायदेशीर कारवाई केलेली आहे.

सराईत आरोपीतांवर करण्यात आलेली कारवाई

कायदा कलम एम.पी.डी.ए. अॅक्ट-

संख्या 40 महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ५६ व प्रमाणे तडीपार महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ५५ प्रमाणे तडीपार ०२

सी.आर.पी.सी. १४४/बी.एन.एस.एस. १६३ प्रमाणे ६ सी.आर.पी.सी. ११०/ बी.एन.एस.एस. १२९ प्रमाणे

सी.आर.पी. सी. १०७ / बी.एन. एस. एस. १२६ प्रमाणे ६५, २३४५

सी.आर.पी.सी.१०९/बी.एन.एस.एस. १२८ प्रमाणे 04 , ८ प्रोव्ही अॅक्ट ९३ प्रमाणे ३५, ९ निर्भया पथकाने देखील मुंबई पोलीस अधिनीयम अंतर्गत कारवाई केली आहे.

३१७ एकुण प्रतिबंधक कारवाई २७९९

तसेच सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील अवैध्य धंद्यावर करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे

कारवाईचा प्रकार

केसेस मुद्देमाल दारुबंदी २३९,२७७२६२५ जुगार ८३,३४२४०८६ ,५९ गुटखा ०८ ,१०३६६३८३ ,२४०२६००० जनावर वाहतुक ०६, ३१९००००

वाहतुक नियमन ३८४७ ,२५०३४०० एकुण केसेस व दंड ४६२८२४

वरील प्रमाणे आम्ही सांगोला पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे प्रतिबंधत्माक कारवाई केल्यामुळे सन २०२५ मधील सांगोला नगरपरिषद निवडणुक भयमुक्त वातावरणात पार पडलेली असुन कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही, तसेच सन २०२६ मधील पंचायत 

व जिल्हा परिषद निवडणुका देखील शांततेत पार पाडण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (ब) व ५५ प्रमाणे व एम. पी. डी.ए. अॅक्ट प्रस्ताव पाटवुन देवुन संपुर्ण

 सोलापुर जिल्ह्यातुन हद्दपार / स्थानबध्द करुन त्यांच्यामध्ये कायद्याची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सन २०२६ मध्ये सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी प्रवृतीचे लोकांवर करडीनजर ठेवुन तसेच जेष्ठ नागरीक, 

महिला, व अल्पवयीन मुलीची छेड काढणारे लोक यांचेवर प्रभावी कारवाई करण्याचे ध्येय आम्ही नववर्षात घेतले असुन सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील सर्व अवैध्य धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प केलेला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, मा.डॉ. बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा उप-विभाग मंगळवेढा यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाणेकडील विनोंद घुगे पोलीस निरीक्षक,

 सांगोला पोलीस ठाणे, API मोरे ( ऑफिस स्टाफ) PSI पुजारी (डि.बी. टिम) WPSI चव्हाण (दामिनी पथक पोकों राजु आवटे, व सांगोला पोलीस कडील अधिकारी व अंमलदार यांनी सदरची कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments