खळबळजनक...सांगोल्यात बनावट गोवा मद्याचा कारखाना उघड;
उत्पादन शुल्कचा छापा, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
राज्यातील अवैध मद्यव्यवसायावर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सांगोला तालुक्यातील शिरभावी येथे सुरू असलेल्या बनावट गोवा मद्यनिर्मिती केंद्रावर छापा
सांगोला : सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील गोवा बनावट मद्य निर्मिती केंद्रावर मिरज येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत ४ लाख ३७ हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.दरम्यान मिरज - पंढरपूर रस्त्यावर पथकाने सापळा लावून
चारचाकीतून होणारी बनावट मद्याची वाहतूक देखील उघडकीस आणली. दोन्ही कारवाईत १६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
याप्रकरणी चौघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये सावंता विजय खोत (रा. कोगनोळी, ता. कवठेमहांकाळ),
आकाश नामदेव खोत, सुनील दादासो खोत (दोघेही रा. चाबुकस्वारवाडी, ता. मिरज) आणि बापू मोहन होवाळ (रा. खेडकर मळा, होवाळ वस्ती, शिरभावी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे.
सांगली येथील राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादने दिलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी आठच्या सुमारास मिरज - पंढरपूर रस्त्यावरील हॉटेल सरपंच समोर पथकाने सापळा लावला होता.
त्यावेळी विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एक चारचाकी (एमएच १४ जीएस ४२०९) पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यामध्ये गोवा बनावट मद्याचा १ लाख ४३ हजार रुपये किंमतीचा साठा आढळून आला.
कारवाईत संशयित सावंता खोत, आकाश खोत आणि सुनील खोत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील संशयित बापू होवाळ राहत
असलेल्या खेडकर मळ्यात बनावट मद्य निर्मितीचे केंद्र असल्याची माहिती मिळाली.मिरजेच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने पंढरपूर येथील उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सोबत घेऊन
शिरभावी येथे छापा टाकला. तेथे गोवा बनावट मद्य, रिकाम्या बाटल्या आणि बुचे असा ४ लाख ३७ हजारचा मुद्देमाल मिळून आला. चौघाही संशयितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी बनावट गोवा मद्य तयार करून ते महाराष्ट्रात विक्रीसाठी पुरवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क मिरजचे निरीक्षक दीपक सुपे,
जतचे निरीक्षक प्रभात सावंत, दुय्यम निरीक्षक अजय लोंढे, लक्ष्मण पवार, जयसिंग खुटावळे, पंढरपूरचे दुय्यम निरिक्षक बापू चव्हाण आदींच्या पथकाने केली.


0 Comments