सांगोला-मिरज मार्गावर सूतगिरणीसमोर अपघात तिहेरी
अपघातात दुचाकीवरील युवक जागीच ठार दुचाकीवरील दोघे जखमी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवदर्शन आणि तेजस चांदेकर कोकणात पर्यटनासाठी निघालेल्या तीन मित्रांच्या दोन दुचाकींना पाठीमागून भरधाव कारने जोरात धडक दिली. परिणामतः दोन्ही दुचाकी समोरील कंटेनरवर आदळून तिहेरी अपघात झाला. या
अपघातात एका दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले. मात्र, सुदैवाने एअर बॅग ओपन झाल्यामुळे कारमधील दोघे जण थोडक्यात बचावले.
हा अपघात शुक्रवार, २३ जानेवारी रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास सांगोला-मिरज महामार्गावर सूतगिरणीसमोर झाला. या अपघातात तेजस नागनाथ चांदेकर
(वय २६, रा. जुना कराड नाका, पंढरपूर) हा ठार झाला. तर मुरलीधर गणपत सासणे (वय २३, रा. अनिल नगर, पंढरपूर) व विशाल नागनाथ नामदेव (वय ३०, रा. सांगोला चौक, पंढरपूर) हे दोघे जखमी झाले.
याबाबत जखमी मुरलीधर गणपत सासणे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कारचालक कोमू व्यंकटेश प्रभाकर (रा. तेलंगणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पंढरपूर येथील मृत तेजस चांदेकर, जखमी मुरलीधर सासणे व विशाल नामदेव
हे तिघे मित्र (एमएच ४५ बी ०५६३) आणि (एमएच १३ ईव्ही ९६२९) या दोन दुचाकींवरून पंढरपूर येथून शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवदर्शन व कोकणात पर्यटनासाठी सांगोलामार्गे निघाले होते.
दोन्हीही दुचाकी सांगोला - मिरज हायवेवरून जात असताना सकाळी ७:३० च्या सुमारास पाठीमागून भरधाव येणाऱ्या (टीएल ०६ एफई ५२११) या परराज्यातील कारने समोरील दोन्हीही दुचाकींना जोराची धडक दिली.
यावेळी दोन्हीही दुचाकी समोरील (एनएल ०१ - एजे ९६५२) या कंटेनरवर पाठीमागून उजव्या बाजूला जोरात आदळून भीषण अपघात झाला. अपघातानंतर मोठा आवाज झाला. आवाजाने बाजूचे नागरिक जमले आणि कंटेनरखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढले.
या अपघातात तेजस चांदेकर याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी मुरलीधर सासणे व विशाल नामदे यांना उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.


0 Comments