भीषण अपघात.. दुचाकीस मागून ट्रॅक्टरची धडक; बारावीची विद्यार्थिनी जागीच ठार वाकी शिवणेतील अपघात : मैत्रीण सुखरूप, वाहतूक रोखली
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : शाळा सुटल्यानंतर घराकडे परतणाऱ्या विद्यार्थ्यानीच्या दुचाकीला पाठीमागून ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात बारावीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला,
तर पाठीमागे बसलेली तिची मैत्रीण बचावली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, संतप्त जमावाने सांगोला-महूद रस्त्यावरील वाकी गावातील वाहतूक अडीच तास अडवून धरली.
ही घटना शुक्रवारी दुपारी १२:३० च्या सुमारास सांगोला-महूद रोडवरील वाकी शिवणे गावातील चौकानजीक घडली. ऋतुजा धनाजी कोकरे
(वय १८, रा. वाकीशिवणे, नरळेवाडी, ता. सांगोला) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.वाकीशिवणेतील अपघातानंतर संतप्त नागरिकांनी वाहतूक अडवून धरली.
नरळेवाडी येथील ऋतुजा कोकरे ही वाकी शिवणे येथील विद्यामंदिर उच्च माध्यमिक विद्यालयात इ.१२ वीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळी ७:३० च्या सुमारास घरातून दुचाकीवरून महाविद्यालयात गेली होती.
येत्या १० फेब्रुवारीपासून बारावी बोर्ड परीक्षा असल्यामुळे तिने प्रॅक्टिकलसह तोंडी परीक्षा दिली.
दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यानंतर ऋतुजा आणि तिची मैत्रीण प्रतीक्षा आटपाडकर या दोघी मिळून नरळेवाडी घराकडे परतत होत्या. त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच-१३-डीवाय-४६६०) ट्रॅक्टर ट्रॉलीने वाकी शिवणे चौकानजीक दुचाकीला पाठीमागन जोराची धडक दिली.
तिहेरी अपघातात युवक ठार
महालक्ष्मी देवदर्शन आणि पर्यटनासाठी निघालेल्या तीन मित्रांच्या दोन दुचाकींना पाठीमागून भरधाव कारने जोरात धडक दिली. दोन्ही दुचाकी समोरील कंटेनरवर आदळून एका दुचाकीवरील युवकाचा सूत गिरणीसमोर जागीच मृत्यू झाला
यावेळी पाठीमागे बसलेली प्रतीक्षा हिने समयसूचकता दाखवून उडी घेतल्याने सुखरूप बचावली, मात्र अपघातात ऋतुजाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने
मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संतप्त जमावाने रस्ता अडवून धरल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.


0 Comments