google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संस्काराच्या शिदोरीतील गुणदर्शन! 10 एकरमध्ये उभारलं आई-वडिलांचं स्मारक! 4 भावंडांची स्टोरी वाचून अभिमान वाटेल

Breaking News

संस्काराच्या शिदोरीतील गुणदर्शन! 10 एकरमध्ये उभारलं आई-वडिलांचं स्मारक! 4 भावंडांची स्टोरी वाचून अभिमान वाटेल

संस्काराच्या शिदोरीतील गुणदर्शन! 10 एकरमध्ये उभारलं आई-वडिलांचं स्मारक! 4 भावंडांची स्टोरी वाचून अभिमान वाटेल


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

आयुष्याच्या संघर्षमय प्रवासात कितीही आनंदी किंवा वाईट क्षण आले,प्रत्येकाला सर्वात आधी आपल्या आई-वडिलांची आठवणच येते. 

गर्भातच संस्काराची शिदोरी देणारी आई आणि संपूर्ण जीवनात आधारस्तंभ बनलेल्या वडिलांचे आपल्यावर परोपकारच असतात.

आई-वडिलांशी जोडलेली नाळ कधीही तुटत नाही. आई-वडिलांविषयी असणारी कृतज्ञता आपल्या कृतार्थ भावनेने प्रत्येक व्यक्ती दाखवू शकतो.सांगोल्यात असाच एक अभिमानास्पद प्रकार समोर आला आहे.

सांगोल्यात माजी आमदार काकासाहेब साळुंखे आणि शारदाकाकी साळुंखे,थोरल्या काकीसाहेब साळुंखे त्यांच्याबद्दल कृतज्ञ भावना व्यक्त करण्यासाठी दीपक साळुंखे पाटील यांनी 10 कोटी रुपये खर्चून आपल्या आई-वडिलांचे स्मारक उभं केलं आहे.

आजच्या बदलत्या जगात वृद्धाश्रमाची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे उत्तम संस्कार कुठेतरी हरवत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये आई-वडिलांच्या परोपकाराची जाणीव कोणाकोणाला असते, 

हा मात्र संशोधनाचा विषय आहे. परंतु, सांगोलासारख्या दुष्काळी भागात काम करणाऱ्या दीपक साळुंखे पाटील यांनी आपल्या आई-वडिलांचे स्मारक उभारून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

या स्मारकाचं खास वैशिष्ट्य काय?

दीपक साळुंखे पाटील यांचे वडील आमदार काकासाहेब साळुंखे आणि त्यांच्या पत्नी थोरल्या काकी व शारदाकाकी साळुंखे यांच्या स्मृतीदिन निमित्ताने

 सांगोल्यात 10 एकर परिसरात भव्य दिव्य स्मारक उभं करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या स्मारकाला अध्यात्मिक केंद्र करण्याचा निश्चय दीपक साळुंखे आणि त्यांच्या 3 भावंडांनी केला आहे. 

शारदाकाकी साळुंखे या एक आध्यात्मिक भगवद भक्त म्हणून सांगोला तालुक्याला परिचित होत्या. त्या विठ्ठल पांडुरंगाची अगाध भक्तीत तल्लीन झाल्याचं सांगितलं जातं. त्यांची अध्यात्मिक सेवा पाहून कुटुंबीय 'आध्यात्मिक नगरी' उभारत आहेत.

महिलांसाठी स्वयंरोजगार केंद्रही उभारणार

यामध्ये भजन ,किर्तन प्रशिक्षणासह मुलांसाठी व्यायाम शाळा अभ्यासिका महिलांसाठी स्वयंरोजगार केंद्र उभं केलं जाणार आहे. सांगोला तालुक्यातील जवळा येथील ग्रामीण भागासारख्या 10 एकर परिसरात काकासाहेब साळुंखे आणि शारदा काकी साळुंखे यांच्या नावाने उभारण्यात येणारं 

हे स्मारक चर्चेचा विषय बनलं आहे. राजकारणाच्या पलीकडे केवळ आध्यात्मिक आणि सामाजिक कामाच्या भावनेतून दीपक साळुंखे पाटील आणि त्यांच्या इतर 3 भावंडांनी मिळून हे स्मारक उभं केलं आहे.

विशेष म्हणजे आपल्या आईने वाचलेले सर्व ग्रंथ, वीणा,टाळ,आईचे कपाट,कपडे अशा गोष्टींचं संग्रहालय देखील उभं करून आईच्या आठवणीत साळुंखे कुटुंबातील भावंड आणि नातवंड रमल्याचं पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments