google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आरक्षण ठरणार, राजकारण ढवळणार ८ऑक्टोबरला नगराध्यक्ष सोडतीकडे राज्याचे लक्ष” तुमच्या नगरपालिकेत कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष?‌८ऑक्टोबरला मंत्रालयात सोडत; राज्यभरातील २७५ नगरपरिषदांसाठी उत्सुकतेचा क्षण

Breaking News

आरक्षण ठरणार, राजकारण ढवळणार ८ऑक्टोबरला नगराध्यक्ष सोडतीकडे राज्याचे लक्ष” तुमच्या नगरपालिकेत कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष?‌८ऑक्टोबरला मंत्रालयात सोडत; राज्यभरातील २७५ नगरपरिषदांसाठी उत्सुकतेचा क्षण

आरक्षण ठरणार, राजकारण ढवळणार ८ऑक्टोबरला नगराध्यक्ष सोडतीकडे राज्याचे लक्ष”


 
तुमच्या नगरपालिकेत कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष?‌८ऑक्टोबरला मंत्रालयात सोडत; राज्यभरातील २७५ नगरपरिषदांसाठी उत्सुकतेचा क्षण

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेचा रंग आता स्पष्ट होणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात नगराध्यक्ष आरक्षणाची सोडत काढली जाणार

 असून, कोणत्या शहरात कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष बसणार हे चित्र या दिवशी स्पष्ट होईल.

राज्यातील २७५ नगरपरिषद आणि ४५ नगरपंचायतींमध्ये आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पूर्णत्वाकडे आली आहे. 

नगरविकास विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक आदेश दिले असून, प्रभागांचे आरक्षण ८ ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

या सोडतीनंतर स्थानिक राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचे गणिते बदलतील, तर काही ठिकाणी नवे चेहरे पुढे येतील.

सोडत जाहीर झाल्यानंतर १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येणार असून, अंतिम आरक्षण २८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.

नगरविकास विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीच्या तारखांबाबतही चर्चेला वेग येणार आहे.

महत्त्वाचे टप्पे

८ ऑक्टोबर: आरक्षणाची सोडत मंत्रालयात

१४ ऑक्टोबर: हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत

२८ ऑक्टोबर: अंतिम आरक्षण जाहीर

या सोडतीकडे राज्यातील सर्व नगरपालिकांचे आणि नगरपंचायतींचे लक्ष लागले आहे. 

कारण याच आरक्षणावरून ठरेल, कोणत्या प्रवर्गाला सत्तेचा गाडा हाती मिळणार — आणि कोण राहणार ‘बाहेरच्या रेषेवर’!

Post a Comment

0 Comments