सांगोला तालुक्यातील घेरडी येथे जुगारावर पोलिसांची धाड ; सुमारे १६ हजार रुपये जप्त
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला(प्रतिनिधी):- घेरडी येथील पारे रोड वरील वेताळ वाडी येथे 'मन्ना ' नावाचा जुगार सुरू असलेल्या ठिकाणी
सांगोला पोलिसांनी धाड टाकून सुमारे १६ हजार ८०० रोख रक्कम जप्त केली असून चार जणांविरोधात कारवाई केली आहे.
याप्रकरणी पो.कॉ. अमर पाटील यांनी, दस्तगीर पाशा जहागीरदार रा. तेनीहळ्ळी ता इंडी जि विजयपुरा सध्या रा. गोल्डन चौक, घेरडी ता. सांगोला , पंकज रामदास घाडगे
रा. कडबे गल्ली, पंढरपूर ता. पंढरपूर , दत्तात्रय दशरथ थोरबोले रा. शिरनांदगी ता. मंगळवेढा , राजु सुतार रा. सिरनांदगी ता. मंगळवेढा याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २ ऑक्टोबर रोजी सांगोला पोलिसांना, गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली
की, घेरडी गावातील, घेरडी ते पारे रोड वरील, वेताळवाडी शाळेच्या पाठीमागे पत्रा शेड समोर झाडाखाली लाईटच्या उजेडात काही इसम पैसे लावून जुगार खेळत आहेत.
सदर ठिकाणी सांगोला पोलीसांनी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोहोचुन, कारवाई करत सुमारे १६ हजार ८०० रुपये रोख रक्कम जप्त केली.
दस्तगीरपाशा जहागीरदार , पंकज घाडगे, दत्तात्रय थोरबोले याना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले तर राजु सुतार हा पळून गेला.


0 Comments