google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विकसित राष्ट्रांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आम.डॉ. बाबासाहेब देशमुख यांची निवड आम.डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा १५ ते २२ फेब्रुवारीदरम्यान लंडन अभ्यास दौरा

Breaking News

विकसित राष्ट्रांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आम.डॉ. बाबासाहेब देशमुख यांची निवड आम.डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा १५ ते २२ फेब्रुवारीदरम्यान लंडन अभ्यास दौरा

विकसित राष्ट्रांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आम.डॉ. बाबासाहेब देशमुख यांची निवड आम.डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा १५ ते २२ फेब्रुवारीदरम्यान लंडन अभ्यास दौरा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्याचे तरुण व अभ्यासू आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची १५ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत

 महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या लंडन येथे आयोजित विशेष आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यास निवड झाली आहे. 

महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सर्वपक्षीय १५ आमदारांसाठी हा सात दिवसांचा अभ्यास दौरा 

आयोजित करण्यात आला असून, विकसित राष्ट्रांमधील नागरी व्यवस्थापन आणि प्रशासकीय कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.

या अभ्यास दौऱ्यासाठी लंडन शहराची निवड करण्यात आली आहे. राज्यातील एकूण १५ लोकप्रतिनिधी या दौऱ्यात

सहभागी होणार असून, त्यामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांचा समावेश आहे.

 तरुण व अभ्यासू आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा या दौऱ्यातील सहभाग सांगोला तालुक्यासाठी अभिमानास्पद मानला जात आहे.

या दौऱ्यात अत्याधुनिक शहरी नियोजन (Urban Planning), पायाभूत सुविधांचा विकास, स्थानिक प्रशासनाची कार्यपद्धती, सार्वजनिक सेवा वितरण व्यवस्था तसेच

नागरिकाभिमुख तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सखोल अभ्यास केला जाणार आहे. 

विशेषतः लंडनमधील प्रगत वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन प्रणाली आणि पारदर्शक प्रशासकीय यंत्रणा यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

या अभ्यास दौऱ्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांसह विविध पक्षांतील १५ आमदारांचा समावेश आहे. 

विधानसभा व सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची महाराष्ट्र 

विधिमंडळाच्या सर्वपक्षीय आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. नागरी व्यवस्थापन, अत्याधुनिक शहरी नियोजन, पायाभूत सुविधा विकास, 

प्रगत वाहतूक व्यवस्था व कचरा व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास करणार आहेत.

 त्यांच प्रमाणे विकसित राष्ट्रांतील पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासन पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यातील उपयुक्त बाबी महाराष्ट्रात राबविण्याचा त्यांचा मानस आहे.

विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधी या पथकात असल्याने हा दौरा सर्वसमावेशक स्वरूपाचा ठरला आहे.

या दौऱ्याच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील विकास मॉडेलचा अभ्यास करून महाराष्ट्रात शाश्वत आणि प्रभावी प्रशासन राबविण्याचा प्रयत्न केला जाणार असून,

 आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सहभागामुळे सांगोला तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments