google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

Breaking News

खळबळजनक...! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

खळबळजनक...! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवून जिंकण्यासाठी तालुक्यात अनेक हौशी उमेदवारांनी

खासगी सावकारांकडे एकर, दोन एकर जमीन गहाण ठेवून लाखो रुपये टक्केवारीने घेऊन निवडणूक लढवल्या.

याबद्दल अनेक रंजक किस्से निवडणूक निकालानंतर चविष्टपणे चर्चिले जात आहेत.

राजकारणातून सत्तेची नशा एकदा चढली की काही खरे नाही, मग कोण काय करेल याचा नेम नाही. जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी कुणी ५० लाख,

 कुणी २५ लाख तर कुणी १० लाख रुपये खासगी सावकाराकडून पाच ते तीन टक्क्याने घेऊन निवडणूक रिंगणात उतरले.

तर अनेकांनी तालुका पंचायतीवर मेंबर होण्यासाठी एकर, दोन एकर जमीन खासगी सावकाराकडे गहाण ठेवून निवडणुकीसाठी लाखो रुपयांचा निधी उभा केला 

आणि निवडणूक यंत्रणा, कार्यकर्ते व मतदारांवर खर्च केले आहेत. ऊस बागायत भागात राजकारणाचे भलतेच वेड दिसून येते.

एका बहाद्दर इच्छुकाने तर सासरवाडीत जाऊन मेहुण्याकडे आग्रह धरून एक कोटी रुपये आणले आणि निवडणुकीत खर्च करून टाकले.

परतफेड करताना पश्चात्ताप

ग्रामीण भागातील निवडणुकीत रंगीत, संगीत पार्ट्या, जेवणावळी, मतदारांना लक्ष्मी दर्शन करण्याची प्रथा आता सर्वश्रुत व रूढ झाली आहे. त्याशिवाय कार्यकर्ते व उमेदवारांना निवडणूक लढविल्यासारखे वाटतच नाही.

आणि मग त्यात हौसे, नवसे व गौसे कार्यकर्ते तुम्हीच निवडून येणार आहात; पण खर्च करा असा सल्ला देतात.

मग हौशी इच्छुक उमेदवार सावकाराकडून टक्केवारीने लाखो रुपये कर्ज घेतले. सावकाराकडील कर्जाची व्याजासह रक्कम परतफेड करताना उमेदवारावर पश्चात्ताप करण्याची वेळ येत आहे.

Post a Comment

0 Comments