google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाढेगाव पंचायत समिती सदस्यपदी वंदना शेळके विजयी; 'एसएससी ७५' मित्र मंडळाकडून स्नेहपूर्ण सत्कार

Breaking News

वाढेगाव पंचायत समिती सदस्यपदी वंदना शेळके विजयी; 'एसएससी ७५' मित्र मंडळाकडून स्नेहपूर्ण सत्कार

वाढेगाव पंचायत समिती सदस्यपदी वंदना शेळके विजयी; 'एसएससी ७५' मित्र मंडळाकडून स्नेहपूर्ण सत्कार


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला: वाढेगाव पंचायत समिती निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल नवनिर्वाचित सदस्य सौ. वंदना भारत शेळके यांचा 'एस.एस.सी. ७५ मित्र मंडळी'

 ग्रुपच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. हा गौरव सोहळा सांगोला येथील 'कुलदीप इलेक्ट्रॉनिक्स' या दीपक चौथे यांच्या दुकानात उत्साहात संपन्न झाला.

 सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. भारत शेळके यांच्या सुविद्य पत्नी असलेल्या सौ. वंदना शेळके या उच्चविद्याविभूषित असून, केवळ स्थानिक नागरिकांच्या प्रेमापोटी आणि आग्रहाखातर त्यांनी निवडणूक लढवून विजय संपादन केला आहे.

भारत शेळके हे न्यू इंग्लिश स्कूल, सांगोला येथील १९७५ च्या पहिल्या दहावी बॅचचे विद्यार्थी आहेत. 

आपल्या वर्गमित्राच्या पत्नीने मिळवलेल्या या यशाचे कौतुक करण्यासाठी सर्व मित्र एकत्र आले होते. यावेळी वंदना शेळके व भारत शेळके या उभयतांचा शाल, बुके 

आणि मनिषा ठोंबरे लिखित 'भावगंध' हा चारोळी संग्रह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना शेळके दाम्पत्याने आपल्या कार्याचा परिचय देऊन मित्र परिवाराने दाखवलेल्या कृतज्ञतेबद्दल आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. राजेंद्र ठोंबरे यांनी केले. त्यांनी यावेळी ७५ च्या बॅचद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. दीपक चौथे यांनी आपले वर्गमित्र भारत शेळके यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

 वंदना शेळके यांच्या भगिनी माधुरिका किरटतकर मॅडम यांनी ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, वयाच्या या टप्प्यावर सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन एकमेकांच्या यशोत्सवात सहभागी होतात, हे पाहून मनाला खूप आनंद होतो.

याप्रसंगी रजनी उकळे-पलसे, शोभा महिमकर-लोखंडे, आशा गुरव-पुजारी, अनुराधा व्हटे-कटरे, नंदकुमार ठोंबरे, रामचंद्र इंगोले, नारायण चव्हाण, जब्बार मुलाणी, रमेश भंडारे यांच्यासह मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments